पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सावरकर, विश्वास बळवंत प्रशासन खंड १९७९ मध्ये केंद्र सरकारच्या सेवेत पाठविण्यात आल्यानंतर प्रथम वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणून ते डायरेक्टोरेट ऑफ वाइल्ड लाइफ रिसर्च अँड एज्युकेशन या संस्थेत रुजू झाले. याच दरम्यान रेडिओ टेलिमेट्रीच्या साहाय्याने प्राण्यांचा माग काढणे, वाघ, जंगली हत्ती व इतर अनेक प्राण्यांना रसायनांचा वापर करून पकडणे व हाताळणे या गोष्टींचेही प्रशिक्षण त्यांनी घेतले. विश्वास सावरकर यांनी इटलीतील रोम येथेही कॉम्प्युटराइज्ड जिऑग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिमचेही प्रशिक्षण घेतले. त्याचवेळेस मेळघाट येथील प्रकल्पाला दहा वर्षे झाल्याच्या निमित्ताने २३ डिसेंबर १९८३ ला व्याघ्र प्रकल्पाला दिलेल्या अतिविशिष्ट सेवेबद्दल विश्वास सावरकरांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. १९८२ मध्ये डि.डब्ल्यू.आर.ई.चे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये रूपांतरण झाले. ही संस्था भारतीय शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून १९८४ मध्ये जाहीर करण्यात आली. तेव्हा वन्यजीव व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाचे प्रमुख म्हणून सावरकर यांची नेमणूक झाली. त्या अंतर्गत १९८४ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या फेलोशिपवर त्यांना वन व्यवस्थापनाच्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकन विद्यापीठात पाठविण्यात आले. या वर्षात त्यांना अमेरिकन वन विभागासोबत प्रत्यक्ष जंगलात काम करण्याचा अनुभव घेता आला. त्यानंतर १९९२ मध्ये अमेरिका व भारत यांच्या संयुक्त प्रकल्पात काम करताना त्यांनी मोठ्या भूभागावर जैवविविधतेचे व्यवस्थापन या प्रकल्पात काम केले. याच प्रकारच्या प्रकल्पासाठी त्यांनी नंतर मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया व ऑस्ट्रेलिया येथेही प्रकल्पाचे नेतृत्व केले. या त्यांच्या कामामुळे दक्षिण आशिया भागात भारतीय वन्यजीव संस्था, वन्यजीव व्यवस्थापन, प्रशिक्षण व संशोधन या क्षेत्रात अग्रगण्य म्हणून मान्यता पावली. १९९५ मध्ये श्रीलंकेतील वन्य जीव संरक्षणासाठी तेथील विभागाचे दृढीकरण व या क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी प्रशिक्षक यासाठी विश्वास सावरकर यांची नेमणूक झाली. १९९६ मध्ये सहा वर्षांसाठी भारत व अमेरिका यांच्यात वन्यजीव संरक्षण व जैवविविधता संरक्षणासाठी महत्त्वाचा प्रकल्प करार झाला. यात भारतातर्फे विश्वास सावरकर यांनी नेतृत्व केले. त्यामध्ये जैवविविधतेसाठी मोठ्या भूभागाच्या व्यवस्थापनासाठीचे तत्त्व व दृष्टिकोन ठरविण्यात आले. त्याचा आजही विविध ठिकाणी उपयोग केला जातो. दक्षिण आफ्रिकेतील काही हिमालयीन तहार जातीच्या प्राण्यांना भारतात परत आणण्यासाठी २००१ मध्ये विश्वास सावरकरांची नेमणूक झाली. नार्वे येथील कृषी विद्यापीठ व भारतीय वन्यजीव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काही अभ्यासक्रम सुरू करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. १९९८ ते २००१ पर्यंत त्यांनी भारतीय वन्यजीव संस्थेचे सह प्रमुख म्हणून काम पाहिले. २००१-२००२ ते या संस्थेच्या वन्यजीवशास्त्र शाळेचे पहिले अधिष्ठाता म्हणून निवडले गेले. त्यानंतर २००३ मध्ये ते निवृत्त होईपर्यंत त्यांनी या संस्थेचे प्रमुख संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पॅलेस्टाईन, तुर्कस्थान, अफगणिस्तान, पाकिस्तान, ३६० शिल्पकार चरित्रकोश