पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साठे, गजानन कृष्णाजी प्रशासन खंड नदीवर पूल बांधण्याचे काम चालू होते. या कामादरम्यान नदीचे पाणी अडविण्यासाठी बंधारे घालावे लागत. तेथील अभियंत्याने लबाडीने कागदपत्रात खोटे बंधारे दाखवले व भ्रष्टाचार केला. साठे यांनी याबाबत हाताखालच्या इन्स्पेक्टर्स करवी चौकशी केली. त्यानंतर ती केस विशेष पोलीस अस्थापनेकडे सोपविण्यात आली. त्यामुळे त्या अधिकार्‍यावर कारवाई झाली. त्यांच्या याच कामाला दाद देऊन त्या वेळचे पश्‍चिम रेल्वेचे महाप्रबंधक संचालक श्रीराम सुब्बन यांनी गजानन साठे यांना आपला स्विय सचिव म्हणून निवडले. १९६७ सालापर्यंत ते या ठिकाणी ते कार्यरत होते. १९६७ मध्ये त्यांना रेल्वे आधुनिक करण्याचे दृष्टीने अभ्यासासाठी अमेरिकेला पाठवण्यात आले. यामध्ये भारतीय रेल्वेतील तीस अधिकार्‍यांचा समावेश होता. साठे या गटाचे प्रमुख होते. अमेरिकेत राहून त्यांनी तेथील रेल्वेचा सखोल अभ्यास केला आणि त्यावरचा ‘मार्केट प्राइस ऑफ रेल्वे’ या विषयावरचा अहवाल भारतीय रेल्वेला सादर केला. त्यातील बर्‍याच शिफारसी नंतर भारतीय रेल्वे लागू करण्यात आल्या. यानंतर त्यांची १९६९ मध्ये राजस्थानातल्या उदयपूर येथे असलेल्या रेल्वे प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक झाली. या कालावधीत साठे यांनी केंद्रात बर्‍याच सुधारणा केल्या. साधारण १००० प्रशिक्षणार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत होते. केंद्रातील शौचालये आणि भोजनगृहातून वाहणारे सांडपाण्यामुळे त्यातून येणार्‍या घाणीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. यासाठी साठे यांनी तात्काळ सांडपाण्याची योग्य व्यवस्था केली आणि त्याच्या खतापासून केंद्राच्या आवारात गहू, मका, भाजीपाला पिकवायला सुरवात केली. तेथील गहू एवढा उत्कृष्ट झाली की, राजस्थान सरकारने बियाणे म्हणून विकत मागितला. याच ठिकाणी कुटुंबनियोजन, व्यायाम, पेपर फुटीवर उपाय अशाही वेगवेगळ्या योजना त्यांनी राबविल्या.

१९७० मध्ये पश्चिम विभागात उपमुख्य वाणिज्य अधिकारी म्हणून त्यांनी चर्चगेट येथे काम केले. नंतर १९७५ मध्ये वडोदरा येथे डिव्हिजन मॅनेजर या पदावर त्यांची नियुक्ती झाली. १९८० ते १९८१ या कालावधीत मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस (तेव्हाचे व्ही.टी.) येथे त्यांनी उपविभागीय व्यवस्थापक पदावर काम केले. ते या पदावर असतानाच मोझांबिक या देशात त्यांची भारतीय रेल्वेच्या ‘राईटस्’ तर्फे नियुक्ती करण्यात आली.

२२० कि.मी. किनारपट्टी लाभलेला आफ्रिका खंडातील हा एक मागासलेला देश. सतत होणार्‍या बंडांमुळे आणि लुटालुटीमुळे इथली रेल्वे सेवा सततच ठप्प झालेली असे. त्यातून शेजारील देशांकडून चलनात होणार्‍या फसवणुकीमुळेही मोझांबिकचे नुकसान होत असे. मोझांबिककडून दक्षिण आफ्रिकेत कोळशाचा पुरवठा होत असे. रेल्वेमार्फतच हा कोळसा पाठविण्यात येई. त्या वेळी दक्षिण आफ्रिकेत सर्व व्यवहारांसाठी सरकारात संगणकाचा वापर होऊ लागला होता. मोझांबिककडून आलेल्या कोळशाचा मोबदला द.आफ्रिकेला द्यावा लागत असे. प्रत्यक्षात दक्षिण आफ्रिका तेथील अधिकार्‍यांनी कागदपत्रात, संगणकीय नोंदीत फेरफार करून मोझांबिक देशाची, अधिकार्‍यांची फसवणूक केली. इथली विस्कळीत रेल्वेसेवा सुधारण्यासाठी गेलेल्या साठे आणि त्यांच्या सहकार्‍याने यांनी द. आफ्रिकेने केलेली ही फसवणूक उघडकीस आणली. दोन्ही राष्ट्रांच्या बैठकीत त्यांनी ती सिद्ध करूनही दाखवली. त्यामुळे द. आफ्रिकेने दहा लाख रँड एवढी रक्कम मोझांबिकला परत केली. साठे यांच्यासोबत याकाळात ३६ जणांचा गट पाठवण्यात आला होता.१९८१ ते १९८५ या काळात साठे यांनी मोझांबिक रेल्वेत काम केले. मोझांबिक वाहतूक मंत्र्यांची पत्नी व गजानन साठे यांच्या पत्नी मीराताईंची एक दिवस भेट झाली. मीराताईंनी ग्रंथालय व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम व नोकरी केल्याचे ३५६ शिल्पकार चरित्रकोश