पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साठे, गजानन कृष्णाजी प्रशासन खंड महाराष्ट्र हिंदी साहित्य संस्था पुरस्कार २००८, लोकसत्ता वुमन ऑफ द इयर पुरस्कार २००८, संकल्प प्रतिष्ठान (कल्याण) जीवन गौरव पुरस्कार २००९, मातृवंदन पुरस्कार २००९, मनोविकास विशेष बाल शिक्षण सोसायटी (अमरावती), आशीर्वाद पुरस्कार २००९, हिंदी साहित्य जीवन गौरव आदी पुरस्कार मिळाले आहेत. - मीनाक्षी राजेंद्र पाटील

साठे, गजानन कृष्णाजी भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवा उपविभागीय व्यवस्थापक,मुंबई(सी.एस.टी.) २२ मे १९२८ भारतीय रेल्वे सेवेतून मोझांबिक या मागासलेल्या पूर्व आफ्रिकेतील राष्ट्राची रेल्वे सेवा सुरळीत करून देण्यासाठी गेलेले व ही कामगिरी योग्य पद्धतीने पार पाडलेले अधिकारी म्हणजे गजानन कृष्णाजी साठे यांचा जन्म पुण्यात झाला. वडील कृष्णाजी गणेश साठे कोकणातले देवाचे गोठणे हे त्यांचे मूळ गाव. हे साठे कुटुंब पुढे कर्नाटकात धारवाडजवळ स्थायिक झाले. त्यांचे आजोबा मद्रास येथे रेल्वे स्टेशन मास्तर होते. कालांतराने गजानन साठे यांचे वडील पुण्यात स्थायिक झाले. आईचे नाव रूक्मिणी साठे असे होते. गजानन साठेंचे शालेय शिक्षण पुण्यातील नावाजलेल्या नूतन मराठी विद्यालय शाळेत झाले. अंगभूत हुशारीमुळे ते शाळेत नेहमी बक्षीस मिळवत. त्या वेळी नानासाहेब नारळकर हे मुख्याध्यापक होते. त्या वेळी साठे यांचा एका विषयांत पहिला क्रमांक आला आणि नारळकरांनी गजाननला शेजारच्या दुकानातून हवी असेल ती वस्तू घेण्याची मुभा दिली आणि गजाननने एक पियानो घेतला. परंतु तो पियानो जपान मध्ये तयार केलेला होता. त्याच वेळी नारळकर यांनी गजानन यांना स्वदेशीचे महत्त्व पटवून दिले. आपल्या देशातल्या पैसा परदेशात जाणार तेव्हा स्वदेशीच वस्तू घेत जा. त्या बालवयात गजानन साठेंवर झालेल्या या संस्काराने त्यांची आयुष्यभर पाठ सोडलेली नाही. पु. ग. सहस्त्रबुद्धे रा. सं. वाळिंबे यांसारखे विद्वान त्यांना शिक्षक म्हणून लाभले. त्याच्या संस्कारतून साठे यांचे व्यक्तीत्त्व घडले. शाळेमध्ये असताना स्काउट चळवळीमध्ये ते सक्रिय होते. १९४५ मध्ये ते नूतन मराठी शाळेतून मॅट्रिकची परीक्षा ८०% गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे सुट्टीत काम करून गजानन साठे पैसे मिळवत. १९४८ मध्ये फर्गसन महाविद्यालयातून बी.एस्.सी. पूर्ण केल्या नंतर ते विजयचित्र मंदीर मध्ये काम करत असत. त्याच वेळी ते आय.ए.एस्. आणि इतर सेवांच्या परीक्षेची तयारी करत होते. १९५३ मध्ये ते युपीएस ची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांची भारतीय रेल्वे मध्ये निवड झाली. रेल्वे मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५५ मध्ये जामनगर येथे साहाय्यक वाहतूक अधीक्षक या पदावर त्यांची नियुक्ती झाली. १९५६ साली राजकोट येथे विभागीय वाणिज्य निर्देशक म्हणून नियुक्ती झाली. १९५९ मध्ये त्यांची मुंबई विभागात भ्रष्टाचार विरोधी अधिकारी म्हणून नेमणूक झाली. याचवेळी गोध्रा येथे स । शिल्पकार चरित्रकोश ३५५