पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड व्ही. श्रीनिवासन करणे आणि तिच्या कामकाजाचा मूल्यमापनात्मक अहवाल तयार करणे. त्यांनी तयार केलेले हे अहवाल युरेनियम खाणी आणि युरेनियम उत्खननाच्या भविष्यातील कामासाठी पथदर्शी ठरत आहेत. अणू ऊर्जेच्या माध्यमातून विद्युत निर्मिती करण्यासाठी ते विशेष आग्रही भूमिका घेत असत. अणू ऊर्जा निर्मितीसाठी लागणार्‍या युरेनियमचे उत्खनन आणि आवश्यक पुरवठा करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. जानेवारी ९१ ते जून ९१ या कालावधीत राजा यांनी केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोहन धारिया यांचे सचिव म्हणून काम पाहिले. जुलै १९९१ ते ९३ या कालावधीत राजा यांची नियुक्ती केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे स्वीय सचिव या पदावर करण्यात आली. राजा यांनी या पदावर असताना देशाच्या तिन्ही संरक्षण दलांसाठी आवश्यक साहित्यांच्या खरेदी करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. १९९६ ते १९९७ या वर्षी राजा हे महाराष्ट्राच्या व्यापार आणि वाणिज्य मंत्रालयाचे सचिव होते. यावेळी ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या बॅनर खाली मुंबई येथे ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स कॉन्फरस’ भरवण्यात आली होती. १९९७ ते ९९ या कालावधीत महाराष्ट्राच्या गृहनिर्माण आणि विशेष सहायता विभागाचे सचिव म्हणूनही राजा यांनी महत्त्वपूर्ण काम केले. आपल्या कार्यकालात राजा यांनी स्वत:बरोबर कार्यरत असणार्‍या अधिकार्‍यांना प्रशिक्षित करण्यामध्ये विशेष रस घेतला. ‘झिरो बजेट इन महाराष्ट्र’, ‘टेकनिक ऑफ झिरो बेस्ड बजेटिंग’, ‘द पोलिटिकल इकोनॉमी इन डेअरी डेव्हलपमेन्ट इन महाराष्ट्र’, ‘स्टेट फायनान्स अँड इकोनॉमिक रिफॉर्मस्’ ही राजा यांनी लिहिलेली पुस्तके महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मार्गदर्शक ठरणारी आहेत. २००८ मध्ये अणू ऊर्जा विभागाचे मुख्य सल्लागार, या पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांच्या प्रशासकीय कौशल्यांचा व अनुभवांचा उपयोग व्हावा यासाठी त्यांची नेमणूक महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळाचे संचालक या पदावर करण्यात आली. - संध्या लिमये

व्ही. श्रीनिवासन सार्वजनिकआरोग्यसचिव-महाराष्ट्रराज्य व्यवस्थापकीयसंचालक सिकॉमसोस्व्हा,सिडको १९ ऑगस्ट १९३० - २५ ऑक्टोबर २००६ महाराष्ट्र राज्यातील उद्योगांच्या भौगोलिक विकेंद्रीकरणात मोलाचे योगदान देणार्‍या व्ही. श्रीनिवासन यांचा जन्म तामीळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात असलेल्या कोम्बूर या गावी झाला. वेदान्त देसिकन हे त्यांच्या वडिलांचे नाव होते. श्रीनिवासन यांनी मुंबई विद्यापीठाची रसायन अभियांत्रिकी पदवी १९५१ मध्ये प्राप्त केली. आपल्या प्रशासकीय सेवाकाळातच श्रीनिवासन यांनी १९६५ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आर्थिक आणि सामाजिक प्रशासन या विषयात पदविका मिळवली. भारतीय प्रशासन सेवेत निवड झाल्यावर त्यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून १९५१ मध्ये पदभार स्वीकारला. त्यानंतर १९६२ ते १९७२ दरम्यान श्रीनिवासन यांनी राज्य औद्योगिक आणि गुंतवणूक महामंडळ (स्टेट इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र म्हणजेच सिकॉम) या महाराष्ट्र शासनाच्या नव्या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सूत्रे स्वीकारली. सिकॉमबरोबरच जुळ्या मुंबईच्या निर्मितीसाठी सिडको (सिटी अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) स्थापन करण्यातही त्यांचाच पुढाकार होता. मधली काही वर्षे श्रीनिवासन ३४३ व ।