पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

I प्रशासन खंड व्ही. पी. राजा देशभराच्या कायदा आणि सुव्यवस्था राखणार्‍या विविध यंत्रणांपर्यंत जलद पोहोचवणं हा गुप्तहेर संस्थेच्या कार्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. गुप्तहेर संस्थेचे संचालक असताना वैद्य यांनी आपल्या कार्याचा एक भाग असलेल्या इमिग्रेशन प्रक्रियेचे संगणकीकरण करण्याची अत्यंत मोलाची कामगिरी केली. यामुळे देशातल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच्या प्रत्येक प्रवाशाबद्दल सर्व प्रकारची माहिती आता स्थानिक कार्यालयात लगेच नोंदवली जाते. यामुळे धोकादायक समाजविरोधी, विशेषत: आंतरराष्ट्रीय दहशतवादी घटकांची माहिती संबंधित अधिकार्‍यांना मिळते आणि ते वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतात. संचालक असताना वैद्य यांनी सुरक्षाविषयक अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनं आणि परिषदांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले आहे. यापैकी टोकियो इथं जून १९८७ ला झालेली इंटरपोल आणि युगांडात कंपाला इथं जून १९९३ ला भरलेली राष्ट्रकूल देशांची सुरक्षा परिषद या विशेष नोंद घेण्याजोग्या होत्या. याशिवाय निवृत्त पोलीस अधिकार्‍यांच्या एका अभ्यास गटानं त्वरित पोलीस चौकशी आणि त्यानंतर जलद न्यायालयीन प्रक्रिया या विषयावर अहवाल तयार केला होता. या अहवालाचे सहलेखन वैद्य यांनी केलं. राष्ट्रीय आणि इतर सुरक्षा या विषयावर त्यांनी संरक्षण प्रबोधिनीत व्याख्यानं दिली आहेत. याच विषयावर वैद्य यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. आपल्या सेवा काळात त्यांनी १९७८ ला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संस्थेत सुरक्षेसंबंधी एक वर्षाचं प्रशिक्षण घेतलं. तसंच भारतीय सार्वजनिक प्रशासन अध्यासनात सहा आठवड्यांचा कोर्स केला. संगणक प्रणाली संदर्भात सखोल ज्ञानही त्यांनी आत्मसात केले. परदेशातील सुरक्षा विषयक प्रशिक्षणातही वैद्य सहभागी झाले. पोलीस सेवेतल्या कालखंडात वैद्य यांना भारतीय पोलीस सेवा पदक, खास कामगिरीसाठी राष्ट्रपतींचं उत्कृष्ट सेवा पोलीस पदक आणि निरनिराळ्या विभागातल्या नोंद घेण्याजोग्या कार्यासाठी विशेष पोलीस पदक असे तीन पुरस्कार मिळाले आहेत. - सुधाकर कुलकर्णी

व्ही. पी. राजा वीरराघवन पक्षीराजा संचालक, महाराष्ट्र विद्युत-नियामक मंडळ ५ सप्टेंबर १९४८ व्ही.पी.राजा यांचा जन्म केरळ राज्यातील कोट्टेंकल येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी असे होते. पक्षीराजा म्हणजे गरुड होय. वडिलांचे नाव वीरराघवनमधील व्ही. हे आद्याक्षर आणि पक्षीराजा या त्यांच्या नावातील पी. हे आद्याक्षर लावून व्ही. पी. राजा असे त्यांचे नाव रूढ झाले. त्यांचे वडील वीरराघवन हे भारत सरकारमध्ये नोकरीला होते. राजा यांनी दिल्ली येथील सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून १९६७ साली भौतिकशास्त्र या विषयात बी.एस्सी. पूर्ण केले व नंतर एम.एस्सी.ची पदवी १९७१ मध्ये तेथूनच प्राप्त केली. याच वर्षी त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातून भौतिकशास्त्रातच एम.ए.ची पदवी संपादन केली. तसेच १९८८ साली त्यांनी इंग्लंडमधील ईस्ट अँग्लिया विद्यापीठातून ‘ग्राम विकास योजना’ या विषयात एम.ए. केले. नंतर पंजाब विद्यापीठामधून १९९६ साली सामाजिक शास्त्र या विषयात एम.फील. पूर्ण केले. १९७६ मध्ये ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले.

व । शिल्पकार चरित्रकोश