पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड ज्युलिओ फ्रान्सिस रिबेरो अधिक भाषणे दिली आहेत. ‘पाणलोट क्षेत्र विकास तंत्र आणि मंत्र’ हे पुस्तक त्यांनी २००४ मध्ये लिहून प्रसिद्ध केले. तर विविध मासिके आणि वर्तमानपत्रांमध्ये पाण्यासंबंधी सुमारे ८० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. आजवर सात पाटबंधारे प्रकल्पांसाठी रानडे यांनी लवाद म्हणून काम पाहिले असून एका जलविद्युत प्रकल्पाच्या ‘डिस्प्युट रिसोल्युशन बोर्ड’चा सभासद म्हणून ते गेली आठ वर्षे काम पाहत आहेत. सुमारे ३०० कोटी रु. खर्चाच्या तारळी दगडी धरणाच्या कामावर गुणवत्ता नियंत्रण सल्लागार म्हणून त्यांनी सुमारे सहा वर्षे काम पाहिले. इथोपिया देशाच्या ७०००० हेक्टर सिंचन प्रकल्पाच्या संपूर्ण कालवा वितरण व्यवस्थेची संकल्पचित्रे रानडे यांनी तेथे राहून तयार केली. मार्च२००६ ते नोव्हेंबर२००९ या कालावधीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुक्यातील सिंचन अनुशेष निर्मूलन समितीवर पाटबंधारे तज्ज्ञ म्हणून त्यांनी सहभाग घेतला. गोदावरी खोर्‍यातील पाण्याचे समन्यायी वाटप या विषयावरील समितीचे अध्यक्षापदही त्यांनी भूषवले. या समितीचा अहवाल डिसेंबर २०१०मध्ये शासनाला सादर करण्यात आला. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील जागतिक बँक प्रकल्पांच्या धरण सुरक्षा समितीचे सल्लागार म्हणून ते २००६ पासून काम पाहत आहेत. - संध्या लिमये

ज्युलिओ फ्रान्सिस रिबेरो केंद्रीय पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक पंजाब ५ मे १९२९ ज्युलिओ रिबेरो यांचे घराणे मूळ गोव्यातले. त्यांचे पूर्वज हिंदू होते. १६ व्या शतकात पोर्तुगिजांनी त्यांचे धर्मांतर करविले. त्यांच्या पूर्वजांचा शिक्षणक्षेत्राशी जवळचा संबंध होता. त्यांच्या समाजात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा मान पहिल्यांदा त्यांच्या आजोबांनी मिळविला. त्यांच्या वडिलांनीही मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात शिक्षण घेतले होते. अशा कुटुंबात रिबेरो यांचा जन्म झाला. मुळात त्यांना पोलिस सेवेमध्ये जाण्याची फारशी इच्छा नव्हती. त्यांनी केंद्रीय सेवेसाठी स्पर्धात्मक परीक्षा दिली होती. पण केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांनी दुसरा पर्याय दिला नव्हता. त्यावेळचे नियमच असे होते की ज्या उमेदवाराची निवड पोलिस सेवेसाठी झाली आहे त्याला दुसर्‍या केंद्रीय सेवेत जाण्याची मुभा नव्हती. ऑक्टोबर १९७३ मध्ये प्रशिक्षणासाठी माऊंटअबूला जावे असा संदेश रिबेरोंना मिळाला व त्यानुसार पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या सुप्रसिद्ध संस्थेत ते दाखल झाले. १९५४ च्या नाताळपर्यंत त्यांनी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण केला. प्रत्यक्ष कामाची सवय व्हावी म्हणून एखाद्या जिल्ह्यात ६ महिने काम करावे लागे. त्यानुसार सध्या गुजरात राज्यात असणार्‍या भडोच येथे रिबेरो यांना अतिरिक्त सहाय्यक पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. प्रशिक्षण संपल्यावर त्यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजची जबाबदारी सोपविण्यात आली. पण चार महिन्यानंतर पश्‍चिम विभागाची सूत्रे हाती घेण्यासाठी त्यांची नाशिकला नेमणूक झाली. या नेमणूकीच्या काळात १९५६ साली त्यांना प्रथमच दंगल काळातील स्थिती हाताळण्याचा अनुभव मिळाला. जून १९५८ मध्ये रिबेरो यांनी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याचा पोलिस अधिक्षक म्हणून सूत्रे हाती घेतली. तेथे असतानाच एप्रिल १९५९ मध्ये त्यांचा विवाह झाला. नंतर नोव्हेंबर १९५९ मध्ये त्यांचेवर शेजारच्या नांदेड जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. अडीच वर्षे नांदेड, नंतर दोन वर्षे सोलापूर अशी सेवा झाल्यानंतर प्रथमच शिल्पकार चरित्रकोश