पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केले. रानडे, विद्यानंद महादेव प्रशासन खंड तेरणा, निम्न दुधना, ऊर्ध्व पैनगंगा या मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीच्या कामाची जबाबदारी पाच वर्षे पार पाडली. त्यानंतर एक वर्ष नागपूर येथून पेंच, गोसीखुर्द या मोठ्या व बर्‍याच मध्यम प्रकल्पांच्या उभारणीचे काम त्यांनी पाहिले. १९९५ मध्ये महाराष्ट्र शासनाचे सचिव, लाभक्षेत्र विकास पाटबंधारे विभाग या पदावरून रानडे निवृत्त झाले. नोकरीत असतानाच गुजरातमधील पानम प्रकल्प आणि इंडोनेशियातील एका प्रकल्पावर जागतिक बॅकेचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. भिमा-सीना या नद्यांना जोडणार्‍या १९ कि. मी. लांबीच्या पाणीपुरवठा कालव्याचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांनी केले. रानडे यांनी जागतिक बँकेच्या जलव्यवस्थापन प्रकल्पासाठी, तसेच जगभरातील विविध देशांतील जलव्यवस्थापन प्रकल्पासाठी सल्लागार म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९८९ ते १९९१ या कालावधीत त्यांनी जागतिक बँकेच्या सहकार्याने चाललेल्या माजलगाव येथील जलप्रकल्पासाठी कालवा बांधणीचा आदर्श आराखडा तयार केला. १९९२ मध्ये रानडे यांनी जागतिक बँकेच्या सहकार्याने ब्राझिल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘माजलगाव पाटबंधारे प्रकल्प आणि महाराष्ट्र शासनाची पुनर्वसन योजना’ या विषयावरील शोधनिबंधाचे वाचन केले. जलसंधारण आणि व्यवस्थापन या विषयवरील रानडे सातत्याने लेखन करत असतात. १९९२ मध्ये त्यांचे रिझर्वायर्स अ‍ॅण्ड एन्व्हॉर्नमेंट (जलसाठे आणि पर्यावरण) हे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित झाले. १९९३ मध्ये तिरुअनंतपुरम येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय जल परिषदेत रानडे यांनी जायकवाडी धरण परिसरातील पक्ष्यांची वसतिस्थाने आणि पर्यावरण यांच्या संवर्धनाचा अभ्यास या विषयावरील शोधनिबंधांचे सादरीकरण केले. २००० मध्ये जळगाव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ठिबक आणि तुषार सिंचन परिषदेत रानडे यांनी मोकाट सिंचन ते ठिबक सिंचन या बदलामुळे निर्माण झालेली समानता आणि समृद्धी या विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण केले. नोकरीच्या काळात व विशेषत: सेवानिवृत्तीनंतर पाण्याच्या क्षेत्रात कशाप्रकारे योगदान द्यावे याबाबत जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांना केलेल्या सुयोग्य मार्गदर्शनामुळे रानडे त्यांना सल्लागार आणि गुरू मानतात. त्यांच्यामुळे ग्लोबल वॉटर पार्टनरशिप आणि दक्षिण आशियायी तांत्रिक सल्लागार समिती या संस्थांमध्ये काम करण्याची संधी रानडे यांना मिळाली. डॉ. चितळे यांच्या सल्ल्याने रानडे यांनी अप्पर भीमा नदी पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापक म्हणून काम करत असताना ‘व्हीजन फॉर डेव्हलपमेंट ऑफ अप्पर भीमा बेसीन बाय २०२५’ या महत्त्वपूर्ण नियोजन आराखड्याचे लेखन केले. या नियोजन आराखड्याचे सादरीकरण त्यांनी २००२मध्ये काठमांडू येथे झालेल्या पहिल्या दक्षिण आशियायी जल परिषदेमधे केले. अशाप्रकारे एकाच खोर्‍याच्या जलव्यवस्थापनाचा संर्वंकश अभ्यास करून विकासाचे परिप्रेक्ष तयार करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयत्न होता. २००३ व २००४ मध्ये रानडे यांना स्टॉकहोम स्वीडन येथील ‘वर्ल्ड वॉटर विक’ वॉटर फेस्टीवल आणि २००५ व २००६ मध्ये ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया येथील ‘इंटरनॅशनल रिव्हर फेस्टीव्हल’मध्ये शोध निबंध वाचण्यासाठी व पोस्टर प्रेझेंटेशनसाठी आमंत्रित करण्यात आले. २००४ मध्ये मॉस्को रशिया येथे झालेल्या कार्यशाळेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. २००५ मध्ये झेंगझाऊ, चीन येथे दुसर्‍या आंतराष्ट्रीय ‘यलो रिव्हर फोरम मध्ये’ भारताच्या नदीजोड प्रकल्पावरील शोधनिबंधवाचन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. ‘रानडे यांनी आजवर पन्नासहून अधिक शोधनिबंधांचे वाचन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये केले आहे. तसेच विविध शासकीय आणि अशासकीय संस्थांमध्ये तांत्रिक विषयावर ३५० पेक्षा ३३४ शिल्पकार चरित्रकोश