पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड रानडे, विद्यानंद महादेव करत असताना १९१०च्या सुमारास त्यांनी फलटणच्या जलव्यवस्थेची आखणी केली. लोखंडी पाईपच्या सहाय्याने नैसर्गिकरीत्या विहिरीचे पाणी (पंपाशिवाय) संपूर्ण फलटणला पुरविले गेले. पुढील पन्नास ते साठ वर्षे ही योजना कार्यरत होती. रानडे यांचे वडील महादेव रानडे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते. नीरा कालव्याच्या सर्वेक्षणाचे तसेच सिंचन व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. आजोबा आणि वडील यांच्याकडून अभियांत्रिकी सेवेत येण्याची प्रेरणा विद्यानंद रानडे यांना मिळाली. विद्यानंद रानडे यांचे प्राथमिक शिक्षण बारामती आणि अहमदनगर येथे झाले. फलटणमधील मुधोजी हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. पुणे येथील फर्गसन महाविद्यालयातून इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर १९६० मध्ये त्यांनी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामधून स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात पदवी घेतली. यावेळी ते पुणे विद्यापीठात प्रथम वर्गात दुसरे आले. त्यानंतर काही काळ त्यांनी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले. हे काम करत असतानाच त्यांनी १९६२ मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची परीक्षा दिली. या परीक्षेत ते राज्यात पहिले आले आणि प्रथम वर्ग अधिकारी म्हणून महाराष्ट्र अभियांत्रिकी विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली. थोड्याच कालावधीत रानडे यांच्या अभियांत्रिकी कौशल्याची जाणीव त्यांच्या वरिष्ठांना झाली. १९६२ ते १९७८ या कालावधीत ते कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी एक मोठा प्रकल्प, ९ मध्यम प्रकल्प आणि २० लघु प्रकल्पांचे सर्वेक्षण, आराखडा, नियोजन बांधकाम या सर्व बाबी पूर्ण केल्या. १९७६ मध्ये त्यांची नियुक्ती भीमा नदीवरील उजनी हे धरण नियोजनापेक्षा एक वर्ष आधी पूर्ण करण्यासाठी करण्यात आली. हे काम त्यांनी १९७८ पर्यंत हाताळले. या कालावधीत त्यांनी आपल्या कामामुळे तत्कालीन पाटबंधारे मंत्री शंकरराव चव्हाण यांचा विश्‍वास संपादन केला. १९७८ ते १९८१ या कालावधीत त्यांची नियुक्ती वॉटर अ‍ॅण्ड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिस या केंद्राच्या सरकारच्या संस्थेत नवी दिल्ली येथे करण्यात आली. या कार्यकालात त्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, ओरिसा, बिहार आणि प. बंगाल राज्यांतील मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून जलसंधारण प्रकल्पांसाठी अर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक असे प्रकल्प अहवाल तयार केले. १९८१ ते १९८२ या काळात रानडे यांच्यावर वॉटर अ‍ॅण्ड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिस, दिल्लीतर्फे या फिलिपिन्समधील मनिला येथे नॅशनल इरिगेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनला तेथील कालवे बांधकामाचा आराखडा तयार करण्यासाठी वरिष्ठ तांत्रिक सल्लागार ही जबाबदारी सोपवण्यात आली. १९८३ ते ८८ या कालावधीत रानडे अधिक्षक अभियंता म्हणून मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या भातसा व वैतरणा धरणांचे जलविद्युतगृहांचे काम केले. उपसचिव म्हणून राज्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या नियोजन व संनियंत्रण केले. दरम्यान फेब्रुवारी ते जून १९८८ या काळात युटाह स्टेट युनिव्हर्सिटी फिनिक्स व शिकागो येथे वॉटर रिसोर्सेस सिस्टीम अ‍ॅनेलेसिस या विषयाचे प्रशिक्षण घेताना पाटबंधारे विभागातील १० अभियंत्यांचे नेतृत्त्व केले. नोकरीच्या संपूर्ण काळात श्री.प.र.गांधी (सेवा निवृत्त सचिव पाटबंधारे विभाग) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. १९८९ मध्ये पदोन्नती मिळाल्यावर मराठवाड्यातील जायकवाडी, मालजगाव, निम्न शिल्पकार चरित्रकोश