पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रानडे, विद्यानंद महादेव प्रशासन खंड मक्तेदारी संपुष्टात आली. जागतिक पातळीवर भारतीय अभियंत्यांनी आपली योग्यता सिद्ध केली. विजयकुमार राणे यांचे उत्तम नेतृत्त्व, संघटन कौशल्य आणि कामातील गुणवत्ता टिकवून ठेवण्याची कार्यपद्धती यामुळेच हे यश भारतीय रेल्वेला प्राप्त होवू शकले. १९८४ मध्ये त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल मॅनेजर यांच्याकडून बेस्ट इंडस्ट्रियल मॅनेजर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९८४-१९८५ मध्ये भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीला सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणून ‘द इकोनॉमिक टाइम्स’ या दैनिकाकडून गौरवण्यात आले. तसेच त्याच वर्षी या कंपनीला वाणिज्य मंत्रालयाकडून सर्वाधिक नफा आणि परकीय चलन मिळवून देणारी कंपनी म्हणून गौरवण्यात आले. राणे यांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचे हे फलित होते. या अनुभवामुळेच आंतराष्ट्रीय कामगार संघटनेच्या माध्यमातून राणे यांनी मार्केटिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट ऑफ इंटरनॅशनल प्रोजेक्ट या विषयावर चीनमध्ये एका आठवड्याची कार्यशाळा आयोजित केली होती. १९९० मध्ये राणे भारतीय रेल्वे बांधकाम कंपनीचे कार्यकारी संचालक या पदावरून निवृत्त झाले. इराकमधील बगदाद-हुसैबाद या ५५० कि. मी. लांबीच्या स्टॅण्डर्ड गेज रेल्वेमार्गाचा कार्य आराखडा तयार करणे, मलेशियातील कौलालंपूर ते सिंगापूर दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, बांग्लादेशमधील ढाक्का ते चितगाव दरम्यानचा रस्ता, नेपाळमधील रस्ते आणि पूल यांचे बांधकाम, मुंबई सेंट्रल ते मथुरा दरम्यानच्या १३०० कि. मी. रेल्वेमार्गाचे अत्यंत कठीण असे नियोजन, कार्य आराखडा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी ही राणे यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. १९९५ ते १९९७ या कालावधीत राणे यांनी बी.ओ.टी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या पश्‍चिम रेल्वेच्या विरंगम मेहेसाणा रेल्वे प्रकल्प, कलकत्ता-हल्दीया दरम्यानचा नवीन रस्ता, मुंबई-पुणे दृतगती महामार्ग आणि केरळमधील एका उर्जा प्रकल्पाचे आर्थिक विश्‍लेषण (फायनान्सिअल व्हाइबिलिटी अ‍ॅनालिसीस) करण्याचे महत्त्वाचे काम केले. संपूर्ण कारकिर्दीमधील स्थापत्य अभियांत्रिकीतील विशेष वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी राणे यांना २००४ मध्ये ‘विश्‍वेश्‍वरय्या कन्स्ट्रक्शन एक्सलन्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय रेल्वेच्या बांधकाम संदर्भातील अनेक सरकारी आणि खासगी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय कंपन्यांसाठी राणे यांनी सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.यामध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन,कॉन्टिनेंटल कन्स्ट्रक्शन, मेट्रो रेल्वे मुंबई, मेट्रो रेल्वे हैद्राबाद यांचा समावेश होतो.

मेट्रो रेल्वे या विषयावर राणे यांचा विशेष अभ्यास आहे. मेट्रो रेल्वेमुळे शहराच्या मुळ सौदर्याला बाधा निर्माण होवू नये, मेट्रो रेल्वेच्या बांधकामाचा आराखडा तयार करताना किमान पुढील २५ वर्षांचा विचार करावा या विषयी ते आग्रही आहेत. सध्या राणे पुणे येथे कार्यरत असून अभियांत्रिकी  संबंधातील विविध संस्थांमध्ये ते व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करतात. नव्या पिढीतील अभियंत्यांना मार्गदर्शन करणे यामध्ये त्यांना रुची आहे. अभियांत्रीकी क्षेत्रातील ज्ञान तरुण अभियंत्यांना देत असतानाच राणे त्यांना विविध प्रकारचे संशोधनात्मक काम करण्यासाठीदेखील सतत प्रोत्साहित करत असतात.

- संध्या लिमये

रानडे, विद्यानंद महादेव सचिव पाटबंधारे विभाग-महाराष्ट्र शासन २९ नोव्हेंबर १९३७ विद्यानंद महादेव रानडे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील फलटण येथे झाला. त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात काम करण्याचा वारसा वडील आणि आजोबा यांच्याकडून लाभला. त्यांचे आजोबा गोविंद रामचंद्र रानडे हे फलटण संस्थानामध्ये अभियंता म्हणून काम शिल्पकार चरित्रकोश