पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड राणे, विजयकुमार जनार्दन की, फार शिकलेला नसूनही त्याच्यामध्ये नैसर्गिकपणेच पोलिसी गुण होता. कोणतेही काम अत्यंत बांधिलकीने आणि कौशल्याने करणे हा त्यांचा महत्त्वाचा गुण विशेष होता. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी अनेक दशके मुंबई पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केली. शहराची लोकसंख्या आणि विविध पंथांमध्ये निर्माण होणारा ताण यांचे नियोजन कसे करावे याची त्यांना उत्तम जाण होती.” - संपादित

राणे, विजयकुमार जनार्दन पहिले कार्यकारी संचालक - भारतीय रेल्वे बांधकाम कंपनी (आय.आर.सी.सी.) २४ मार्च १९३० विजयकुमार जनार्दन राणे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागातून उपसचिव होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीचे सचिव म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबतही काम केले होते. विजयकुमार यांच्या आईचे नाव अनसुया असे होते. १९४७ मध्ये विजयकुमार राणे यांनी मुंबई येथील विल्सन हायस्कूल मधून मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. राणे यांनी मुंबई येथील व्ही.जे.आय.टी. (सध्याचे वीरमाता जीजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट) मधून १९५२ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. १९५३ मध्ये ते भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले. बडोदा येथील रेल्वे स्टाफ कॉलेजमधील प्रशिक्षणानंतर १९५५ मध्ये ते पश्‍चिम रेल्वेमध्ये मुंबई येथे रुजू झाले. १९५५ ते १९९० या कारकिर्दीत त्यांनी पश्‍चिम रेल्वे, उत्तर सिमांत रेल्वे, दक्षिण-पूर्व रेल्वे, मुंबई मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट रेल्वे, रेल्वे स्टाफ कॉलेज अशा विविध विभागात काम केले. साहायक अभियंता ते मुख्य अभियंता अशी पदोन्नत्ती घेत त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये सर्वेक्षण बांधकाम, रेल्वे व्यवस्थेचे नियोजन अशा जबाबदार्‍या पार पडल्या. १९६० ते १९६३ या कालावधीत राणे उत्तर सिमान्त रेल्वेमध्ये कार्यरत होते. या कार्यकालात हिमालयाच्या पायथ्याशी, ब्रह्मपुत्रानदीच्या तीरावर तसेच अरुणाचल प्रदेशमध्ये रेल्वेमार्ग बांधकामाची जबाबदारी त्यांच्यावर होती. इराक येथे बांधण्यात आलेल्या स्टॅण्डर्ड गेज ६००कि.मी. लांब रेल्वेमार्गाच्या व्यावसायिक तंत्रज्ञ अभ्यासगटाचे नेतृत्त्व त्यांनी केले. १९७२ मध्ये राणे यांच्या नेतृत्त्वाखाली राजधानी एक्सप्रेस या गाडीचा मुंबई सेंट्रल ते मथुरा जंक्शन या १३०० कि.मी. लांबीच्या मार्गाचे आधुनिक सुधारित बांधकाम करण्यात आले. या कामामुळे राजधानी एक्सप्रेस ताशी १२० कि. मी. वेगाने सुलभतेने धावू लागली. १९७२ मध्ये राणे यांना भारतीय रेल्वेकडून फ्रान्स येथे रेल्वे ट्रॅक बांधकाम आणि डागडुजी यांचे अत्याधुनिक प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले. या काळात त्यांनी पॅरीस शहरातील मेट्रो रेल्वे आणि फ्रान्समधील रेल्वेमार्गांचा अभ्यास केला. नोव्हेंबर १९७७ मध्ये राणे यांच्यावर इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. या पदावर त्यांनी उत्तम कामगिरी करून भारतीय रेल्वेला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून दिले. इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीने इराण, इराक, सौदी अरेबिया, जॉर्डन, तुर्कस्तान, अल्जेरिया, नायजेरीया, झांबिया, इंडोनिशिया, मलेशिया, नेपाळ आणि बांग्लादेश या १२ विकसनशील देशांमध्ये रेल्वेमार्ग बांधकामाची कंत्राटे घेतली. राणे यांच्या नेतृत्त्वाखाली ही सर्व बांधकाम कंत्राटे नियोजित वेळेत, नियिजित बजेटमध्ये आणि गुणवत्तेने पूर्ण होवू शकले. यामुळे रेल्वेमार्ग बांधकाम क्षेत्रातील युरोपियनांची आणि अमेरिकेची शिल्पकार चरित्रकोश