पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राणे, रावसाहेब दाजी प्रशासन खंड १९७१ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासकार्यक्रमांतंर्गत वनप्राणी व निसर्ग आधारित पर्यटन अभ्यास करण्यासाठी ते अफ्रिकेला रवाना झाले. भारत सरकारच्या सहकार्याने जंगलवाढीसाठी प्रायोगिक तत्त्वावर हवाई बीज पेरणे कार्यक्रम झाला. याचे रड्डी समन्वयक होते. घूस उंदिरांची संख्या वाढते. घनदाट झाडी, प्रचंड मोठी जंगले आणि वन्यप्राण्यांचे असलेले वैविध्य यांचा सखोल अभ्यास रड्डींनी आपल्या या दौर्‍यात केला. १९८५ मध्ये भारतात सामाजिक वनीकरण नावाची एक अभिनव कल्पना उदयास आली. या कल्पनेस अमेरिकेचे साहाय्य होते. यादरम्यान जंगलेतर पडीक जमिनीवर वृक्षलागवड करायची परंतु वृक्षलागवडीनंतर सामाजिक दुर्लक्षाने ती झाडे वाढत नाहीत तेव्हा समाजात जाऊन त्या झाडाचे महत्त्व, वन्यजीवाचे महत्त्व व इतर माहिती जनतेला द्यायची आणि सामाजिक वनीकरण करायचे हे काम अरविंद रड्डी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या प्रकल्पानंतरच सरकारी पातळीवरच्या प्रयत्नावरच हिरवा झाल्याचे दिसून आले. सामाजिक वनीकरण प्रकल्पादरम्यान आलेली महत्त्वाची अडचण म्हणजे कोकणातली कोकणात सरकारी मालकीची जमीन राबवणे कठीण होते. तेव्हा अरविंद रड्डी यांनी एक वेगळीच युक्ती लढवली आणि ती म्हणजे समुद्राकाठची खारफुटीची जमीन या जमिनीत कुठलीही वनस्पती येत नाही पण समुद्राच्या खार्‍या पाण्यात येणारी कांदणी, योनर, चोपी या वनस्पतींची समुद्रकाठावरच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली आणि ही वनस्पती गुरेही आवडीने खातात. तेव्हा त्यांच्याप्रमाणे चाराही झाला समुद्रातील लहान मासे यांना प्रजोत्पादनासाठी या वनस्पतींच्या मुळात अडचणीत अंडी घालण्यास जागाही मिळाली आणि समुद्रकिनारा हरित झाला. हे त्यांचे संशोधन अतिशय महत्त्वाचे ठरले. त्याचा या संशोधनासाठी जगभरातून गौरव झाला आणि जपानमधील एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्राप्रमाणे निमंत्रित करण्यात आले. आज निवृत्तीनंतर अरविंद गोविंद रड्डी पुण्यात स्थायिक असून एम.आय.टी. कॉलेज, पर्यावरण संतुलित ग्रामीण विकास, निसर्ग पर्यटन, एम.बी.ए. पर्यावरण विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य करतात. याही वयात त्यांचे जंगल व निसर्गवेड संपलेले नसून आजही त्यांनी मातीशिवाय पालापाचोळ्याचा उपयोग करून आपल्या घरात आणि गच्चीत भले मोठे वैविध्यसंपन्न उद्यान उभे केले आणि तेवढ्याच नेटाने ते आता सांभाळत असतात. आजही ते निसर्गसंवर्धन, सामाजिक वनीकरण, पर्यावरण संतुलित ग्रामीण विकास आणि निसर्ग पर्याटन यासाठी आग्रही असतात. - दत्ता कानवटे

राणे, रावसाहेब दाजी सुभेदार जन्म-मृत्यू अनुपलब्ध १८६० ते १९०० या कालावधीत ते मुंबई पोलीस सेवेत कार्यरत होते. रावसाहेब दाजी राणे यांना मुंबई शहराची खडान्खडा माहिती होती. त्यावेळी मुंबईमध्ये मुस्लीम आणि पारशी यांच्यात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचे महत्त्वाचे काम रावसाहेब राणे यांनी केले. कोणतेही काम अत्यंत कौशल्याने पार पाडण्याचे कसब त्यांच्या अंगी होते. आर.सी.एस. अधिकारी एम.एस.एडवर्डस् यांनी ‘मुंबई शहर पोलीस’ या पुस्तकात रावसाहेब राणे यांचे केलेले वर्णन हे त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष पटवून देते. रावसाहेब राणे यांचे वर्णन करताना एडवर्डस् लिहितात, “हा एक असा भारतीय अधिकारी होता ३३० शिल्पकार चरित्रकोश