पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यार्दी, मधुकर रामराव प्रशासन खंड यार्दी, मधुकर रामराव केंद्रिय वित्त सचिव, संस्कृत अभ्यासक २२ ऑगस्ट १९१६ - २० ऑगस्ट २००१ मधुकर रामराव यार्दी यांचा जन्म कोकणातल्या सुपे नावाच्या छोट्या गावात झाला. काळ्या नदीवर वसलेले हे गाव धरणाखाली गेल्यामुळे आता अस्तित्वात नाही. त्यांच्या आईचे नाव जानकीबाई होते. वडील सरकारी नोकरीत होते. आठ मुलांचे त्यांचे मोठे कुटुंब होते. मधुकरला उत्तमोत्तम शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आईवडिलांनी कंबर कसली. मधुकर शालेय शिक्षणासाठी कारवार व धुळ्यामध्ये मोठ्या भावांकडे राहिला. नंतर यार्दींनी पुण्यात येऊन प्रथम फर्गसन व नंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. गणित व संस्कृत हे त्यांचे आवडते विषय होते. बी.ए. व एम.ए ला त्यांना कुलपती पदकाचा (चँसलर मेडल) मान मिळाला. प्राध्यापक रा.ना.दांडेकर, डी.डी.कोसंबी व डी. डब्ल्यू. केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संस्कृत, गणित व प्राच्यविद्या यांचा अभ्यास केला. १९४० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा आयसीएस परीक्षेत सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी मिळविला. त्या वेळच्या मुंबई राज्यात जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द फार गाजली. नंतर महाराष्ट्राचे गृह सचिव व वित्त सचिव म्हणून त्यांनी काम केले. १९६२ मध्ये त्यांची केंद्रीय अर्थ खात्यामध्ये नियुक्ती करण्यात आली. केंद्र सरकारच्या नियोजन विभागाचे सल्लागार आणि गृह खात्यात अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केले. योजना व गृह खात्यामधील विविध समित्यांवरही त्यांनी काम केले. केंद्रीय वित्तसचिव ह्या पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर १९७४ मध्ये ते निवृत्त झाले. शासकीय सेवेत कार्यरत असताना सुद्धा यार्दी यांनी संस्कृतचा अभ्यास चालू ठेवला होता. नाशिकला जिल्हाधिकारी असताना करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली शांकरभाष्यातील ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. पूर्वी प्रा.कोसंबी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संख्याशास्त्राचा अभ्यास केला होता. मार्क्सवादी कोसंबी आणि परंपरावादी डॉ.कुर्तकोटी या दोन टोकाच्या विद्वानांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला. निवृत्तीनंतर यार्दी यांनी संस्कृतचा अभ्यास व लेखनकार्य आणि शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या शिल्पकार चरित्रकोश ३२७