पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंगलमूर्ती, माधव केशव प्रशासन खंड परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेसोबतचे भारताचे राजनैतिक संबंध दृढ करण्याचे महत्त्वाचे काम मंगलमूर्ती यांनी केले. दोन्ही देशांमधील राजनैतिक, सांस्कृतिक, व्यापारविषयक आणि संरक्षणविषयक संबंधांचा पाया घालण्याची जबाबदारी मंगलमूर्ती यांनी पूर्ण केली. जून १९९६ मध्ये द. आफ्रिकेचे उच्चायुक्त या पदावरून ते अठ्ठावन्नाव्या वर्षी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर काही वर्षे त्यांनी हिंदुजा फाउण्डेशन चॅरिटेबल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून काम केले. सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत. - संध्या लिमये

३२६ शिल्पकार चरित्रकोश