पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोहनी, श्यामकांत पुरुषोत्तम प्रशासन खंड यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र जल व सिंचन आयोगा’चे सचिव म्हणून समर्थपणे त्यांनी धुरा सांभाळली आणि राज्याचा ‘जल विकासाचा’ आराखडा दिग्दर्शित करणारा २००० पानांचा पाच खंडात विभागला गेलेला अहवाल (१९९९) प्रसिद्ध करून अलौकिक असे योगदान प्रदान केले आहे. डॉ.मोरे यांना इतिहासाचं प्रेम आहे यातूनच मानवी जीवन, संस्कृती घडविण्यास कारणीभूत ठरणारे दोन ते अडीच हजार वर्षांपासूनचे पाण्याच्या सामाजिक, आर्थिक, तांत्रिक आणि न्यायिक अंगांवर प्रकाश टाकणारे अनेक पदर त्यांनी समाजापुढे उलगडून ठेवले. याचा परिपाक म्हणून विद्यापीठाने त्यांना या विषयातली डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आहे. भीमा जलसेतुसारखी सुंदर वास्तू, विष्णुपुरी प्रकल्पाचे नाविन्यपूर्ण संकल्पचित्र अशा अनेक सुंदर व मजबूत वास्तूंच्या निर्मितीत ते खूप रमले. माकणी येथील तेरणा नदीवरील नदीपात्रातील थांबलेले, कंत्राटदारांनी पाठ फिरविलेले अवघड काम ७-८ महिन्यांच्या (१९८९) कालावधीत शासकीय यंत्रणा व स्थानिक मजूरवर्ग यांना विश्वासात घेऊन ते काम तडीस नेण्याची त्यांची प्रशासकीय व अभियांत्रिकी हातोटी ही वाखाणण्यासारखी होती. हेच कसब त्यांनी (१९९२) पेनगंगा या विशाल प्रकल्पाच्या १० ते १२ वर्षे वयाच्या कालव्यावरील अनेक बांधकामांना पडझडीपासून सावरताना दाखविले. ३०सप्टेंबर१९९३ या किल्लारीच्या भूकंपात स्वयंप्रेरणेने संकटग्रस्तांना त्यांनी मदतीचा हात दिला. शेतकर्‍यांचे अज्ञान व दारिद्य्र, यातून त्यांचे होणारे शोषण आणि पर्यायाने समाज व देश आर्थिकदृष्ट्या दुबळा होणे, हे टाळण्यासाठी व शेतकर्‍यांना सक्षम केलं पाहिजे यासाठी समविचारी मंडळींना बरोबर घेऊन राज्यभर सिंचन संमेलने, परिषदा भरवून हजारो शेतकर्‍यांना सबल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘महाराष्ट्र सिंचन सहयोग’ व ‘भारतीय जलसंस्कृती मंडळ’ या सेवाभावी संस्थांचे ते अध्यक्ष आहेत. खाजगी क्षेत्रातील ताकदीचा विकास कार्यासाठी सहभाग घ्यावा असे त्यांना वाटते. पुण्याजवळ मुठा नदीवर एम.आय.टी., पुणे संस्थेकरवी पूर्णत: खाजगीकरणातून एक धरण उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. पाण्यासंबंधीच्या चांगल्या लेखनाचे एकत्रीकरण करून त्यांचं ग्रंथ रूपात संपादन करण्याचे कामपण त्यांनी हाती घेतलेले आहे. सिंचन साधना हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे तर सिंचन चिंतन प्रकाशनाच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र शासनाने (२००७) गोदावरी खोर्‍याच्या एकात्मिक विकास आणि व्यवस्थापनाचा बृहत आराखडा तयार करण्याची जबाबदारी शासनाचे तांत्रिक सल्लागार म्हणून त्यांच्यावर सोपविलेली आहे. त्यांना २००४ साली सेटल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा वनश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. ते महाराष्ट्र सिंचन सहयोग या शिखर संस्थेचे अध्यक्ष आहेत. - संपादित

मोहनी, श्यामकांत पुरुषोत्तम मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य १८ ऑगस्ट १९२५ - २१ एप्रिल २००५ श्यामकांत पुरुषोत्तम मोहनींचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांचे म शिल्पकार चरित्रकोश