पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्र प्रशासन खंड मेन्डोन्सा, रोनाल्ड हँसिंथ त्यानंतर तत्कालीन मुंबई प्रांतातल्या (जो अहमदाबादपासून कारवारपर्यंत पसरलेला होता) सोलापूर, अलिबाग, मेहसाणा, सांगली, पुणे इत्यादी अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणजे डी.सी.पी. (डिस्ट्रिक्ट सुपरिन्टेंडंट ऑफ पोलीस) म्हणून उत्तम कामगिरी बजावली. १९५७ साली ते पुण्याचे जिल्हा पोलीस प्रमुख असताना संयुक्त महाराष्ट्र व गोवामुक्ती ही दोन्ही आंदोलने ऐन भरात होती. दोन्ही आंदोलनांचे मुख्य केंद्र पुणे हेच होते. केंद्र सरकार संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाकडे अनुदार दृष्टीने बघत असल्यामुळे आणि गोव्याचे पोर्तुगीज पोलीस मुक्ती आंदोलकांवर जबरदस्त दडपशाही करीत असल्यामुळे वातावरण अतिशय तंग होते. अशा स्थितीत मधुकर मुगवे यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू दिली नाही. मे १९५७ मध्ये ‘डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस’ (डी.आय.जी.) या पदावर बढती मिळून त्यांची राजकोट येथे बदली झाली. तिथे त्यांनी हुसेन कोडिया नावाच्या कुख्यात गुंडाला ठार मारून पोलीस खात्याची शान एकदम उंचावली. हुसेन कोडिया हा गुंड पाकिस्तानातून अवैध मार्गाने भारतात पळून आला होता. तो जुनागडच्या परिसरात राहत असे आणि त्याने एका फौजदाराला ठार मारले होते. मधुकर मुगवे आणि त्यांच्या पोलीस दलाने जामनगर-जुनागड-राजकोट परिसरातील डोंगराळ भागात हुसेन कोडियाचा पिच्छा पुरवून सर्व बाजूंनी त्याला कोंडले. पोलिसांच्या शरणागतीच्या आवाहनाला उत्तर म्हणून त्याने बारा बोअर बंदुकीतून पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्याला गोळी घालून ठार करण्यात आले. १९६०मध्ये पोलीस अतिरिक्त उपप्रमुख (अ‍ॅडिशनल डी.आय.जी.) म्हणून मुगवे परत मुंबईला आले. १९६५ साली नागपूर येथे पोलीस आयुक्त (कमिशनर ऑफ पोलीस-सी.पी.) हे नवे पद निर्माण होऊन मधुकर मुगवे यांची तिथे नेमणूक झाली. १९६६ मध्ये पुन्हा ते मुंबईत सी.आय.डी. खात्याचे डी.आय.जी. इंटेलिजन्स या पदावर आले. ते १९७३ पर्यंत म्हणजे सात वर्षे तिथे होते. या अत्यंत महत्त्वाच्या पदावर इतका दीर्घकाळ टिकलेले ते पहिलेच अधिकारी होत. १९७३ ते १९७५ या काळात ते मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. १९७५ ते १९७७ या कालखंडात महाराष्ट्र राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे संचालक म्हणून काम केल्यावर, कारकिर्दीच्या अखेरीस ते इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (आय.जी.पी.) या राज्यातील त्या वेळच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊन १९७८मध्ये निवृत्त झाले. - दीपक राव

मेन्डोन्सा, रोनाल्ड हॅसिंथ रॉनी मेन्डोेन्सा पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य ११ सप्टेंबर १९४१ रोनाल्ड हॅसिंथ मेन्डोन्सा उपाख्य रॉनी मेन्डोन्सा यांचा जन्म कर्नाटकात झाला. एका ख्रिश्चन घराण्यात त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांना त्यांच्या मातृभाषेबरोबरच मराठीही उत्तम बोलता येते. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कालियनपूर येथे त्यांचे शालेय शिक्षण पार पडले. मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयातून त्यांनी प्राणिशास्त्रात बी.एस्सी.ची पदवी प्रथम क्रमांकाने म । शिल्पकार चरित्रकोश ३१५