पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

cisF HERE 1 पर ग स 2 मुगवे, मधुकर गणपत प्रशासन खंड साली उपआयुक्त, तर १९९५ साली ते पोलिस आयुक्त झाले. १९८७ साली पुण्यातच महानिरीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग) या पदावर नियुक्ती झाली. त्यांच्या पुण्यातील कारकिर्दित पानशेतचा पूर, मंडईची गणपती दंगल, जनरल वैद्य यांचा खून हे महत्त्वाचे प्रसंग आले. सी.आय.एस.एफ.च्या स्थापनेपासून सात वर्षे ते कमांडर होते. नंतर ऑटोमिक कमिशनवर डायरेक्टर सिक्युरिटी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. निवृत्तीच्या शेवटच्या तीन वर्षात ते महाराष्ट्र सचिवालयात प्रधान सचिव होते. तेथेच पोलिस महोसंचालक पद त्यांना मिळाले. सेवेत असताना त्यांना १९७५ साली विशेष सेवेसाठीचे भारतीय पोलीस पदक गुणवत्ता पदक व १९८५ साली विशिष्ट सेवा पदक व १९८५ साली विशिष्ट सेवा पदक हे सन्मान प्राप्त झाले. त्यांच्या कारकिर्दितील विशेष उल्लेखनीय कार्याचा आढावा घ्यायचा झाल्यास पुढील गोष्टी नमूद करता येतील, धुळ्याला श्रमिक संघटनेकडून होणारा हिंसाचार रोखण्यासाठी प्रथमच सौम्य प्रतिबंधक कार्यवाहीचा उपयोग केला. तसेच पुण्याला आयुक्त असताना महिला संरक्षणासाठी कलम ११० (ग) भा.दं.प्र. विधानाचा वापर केला. मुक्तांगण व पोलिस सहकार्याने गर्दचा प्रचार रोखला. औरंगाबादला लाँग मार्चचे वेळी संभाव्य दंगली व दलितांवरील अत्याचार सौम्य मार्गाने टाळला. तसेच हिंदू व मुस्लिमांनी परस्परांचा जामिन दिला पाहिजे अशी योजना करून जातीय तणाव टाळला. औरंगाबादचे डी.आय.जी. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगावर निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले. ‘माहिती हक्क ही पोलिस यशाची गुरूकिल्ली’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. पोलिसांना न्यायदंडाधिकार्‍यांचे काही अधिकार मिळवून देण्याचा कायदा बनविण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. इंटरनॅशनला लाँगिटीव्हीटी सेंटरचे ते सदस्य आहेत. कायद्याची अंमलबजावणी अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी, तसेच लोकसहभागाने गुन्हे नियंत्रण व सुकर न्यायदान व्हावे म्हणून निवृत्तीनंतरदेखील भास्कर मिसर आजही कार्यरत आहेत. - संतोष शिंत्रे

मुगवे, मधुकर गणपत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य ३१ जानेवारी १९२० मधुकर गणपत मुगवे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण विल्सन हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल व एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये पार पडले. १९४० मध्ये महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असतानाच मधुकर व त्यांचे मोठे भाऊ दत्तात्रेय यांनी कलकत्ता (कोलकाता) येथे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरीची स्पर्धा जिंकून नेत्रदीपक यश मिळवले होते. मात्र इतिहास या विषयात पदवी घेतल्यानंतर १९४२ मध्ये मधुकर मुगवे तत्कालीन मुंबई प्रांताच्या पोलीस खात्यात दाखल झाले. १९४७ सालच्या मे महिन्यापासून ‘इंपीरियल पोलीस सर्व्हिस’ या ब्रिटिश व्यवस्थेच्या जागी ‘इंडियन पोलीस सर्व्हिस’ ही नवी प्रणाली अस्तित्वात आली. मधुकर मुगवे यांना या नव्या प्रणालीत ‘सुपरिन्टेंडंट ऑफ पोलीस’ या पदावर बढती देऊन १९४२ च्या वरिष्ठतेसह सामावून घेण्यात आले.

शिल्पकार चरित्रकोश