पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिरानी, नारायण विशनदास प्रशासन खंड केली. १९९३ आणि १९९४ साली ‘इंटरनॅशनल फॉरेस्ट कॉन्फरन्स’ झाली. यात राज्यातर्फे वनमंत्र्यांना पाठविले होते. नागपूर येथे १९८६ मध्ये वनविभागाचे मुख्यालय म्हणून ‘वनभवन’ इमारतीसाठी डॉ. मसलेकरांनी पाठपुरावा करून शासनाची मंजुरी घेतली. १९९३ - ९४ मध्ये डॉ. मसलेकरांनी सई परांजपे दिग्दर्शित ‘पपीटा’ या चित्रपटासाठी केंद्र आणि राज्यशासनाकडून आर्थिक मदत मिळवून दिली. हा चित्रपट वने आणि आदिवासींवर आधारित होता. डॉ. मसलेकरांनी ‘फॉरेस्ट पॉकेट बुक’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले व वनव्यवस्थापनावर आधारित असलेल्या या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या काढल्या. त्यांचे अनेक शास्त्रोक्त लेख प्रसिद्ध झाले. त्यांचे ‘जंगलची वाट’ हे आत्मवृत्त १९९४ साली प्रसिद्ध झाले. डॉ. मसलेकरांना उत्कृष्ट संशोधन लेखांबद्दल १९७२ साली ‘सर डेट्रिच ब्रॅन्डीस’ हे पारितोषिक मिळाले. १९८३ मध्ये टाटा रिसर्च फाउण्डेशन, पुणेतर्फे घेतलेल्या निबंध स्पर्धेत त्यांना दुसरे पारितोषिक मिळाले. १९९८ मध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्रालयाने त्यांना ‘कार्य आयोजन सुधारणा समिती’चे अध्यक्ष केले. १९९४ मध्ये ‘जंगलची वाट’ या पुस्तकाला उत्कृष्ट आत्मवृत्ताबद्दल कै. हरी नारायण आपटे स्मृती पारितोषिक मिळाले. २००९ मध्ये सांगलीच्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठातर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत मसलेकरांना प्रथम पारितोषिक मिळाले. डॉ. मसलेकर यांनी ड्रॉइंग ,पेंटिंग, यांसाठी अनेक पारितोषिके मिळवली होती. त्यांना नाटकात काम करायलादेखील आवडायचे. १९५५ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या ‘यूथ फेस्टिव्हल’मध्ये पुणे विद्यापीठाच्या ‘सतरा वर्षे’ या नाटकाला त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवून दिले होते. - अनघा फासे

मिरानी, नारायण विशनदास प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन २३ ऑक्टोबर १९३३

 नारायण मिरानी हे मूळचे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील. फाळणीनंतर ते मुंबईमध्ये स्थायिक झाले. १९५५ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी(बी.ई.सिव्हील) या विषयात सुवर्णपदक मिळवून पदवी घेतली. १९५५ मध्ये त्यांनी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची परीक्षा दिली. ही परीक्षा ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.१९६२ ते ६८ या कालावधीत ते कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत होते.तर १९६८ ते ७६ या कालावधीत त्यांची नेमणूक वरिष्ठ अभियंता या पदावर करण्यात आली.१९७६ ते ८४ या कालावधीत मिरानी यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता म्हणूनही जबाबदारी पार पाडली.

नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्यात वाहतूक जलद आणि सुलभ व्हावी या उद्देशानेे करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बांधकाम प्रकल्पांच्या उभारणीमध्ये मिरानी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यामध्ये ठाणे खाडीवरील पूल, बॉम्बे ट्रान्स हार्बर लिंक, बांद्रा-कुर्ला संकुल, इस्ट अ‍ॅण्ड वेस्ट आयलँड फ्री वे, मलबार हील बोगदा, कशेळी खाडीदरम्यानचा बोगदा, तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्रभर बांधण्यात आलेले रस्ते या सर्व बांधकाम प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला चालना देणार्‍या या प्रकल्पांचा आराखडा तयार करणे, त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे या कामी मिरानी यांनी आपले अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय म ३१२ शिल्पकार चरित्रकोश