पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड मसलेकर, आनंद रामचंद्र सभासद होते. या वेळी ‘वनसर्वेक्षण आणि भूतानची वनसंपदा’ या विषयावर त्यांनी अहवाल सादर केला. १९७४ ते १९७६ मध्ये इथिओपियात त्यांनी ‘युएनडीपी-वर्ल्ड-फूड प्रोग्रॅम’ साठी वनतज्ज्ञ आणि प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले. तिथे वनीकरणाच्या २४ कामांची आखणी केली. खाद्यसामग्री आणि वितरणाची व्यवस्था केली. त्यांनी ‘अंगमेहनत आणि खाद्य’ यांची सांगड घालणारे परिमाण तयार केले. १९६८ ते १९६९ मध्ये ‘महाराष्ट्र वनविकास मंडळा’ची स्थापना केली. यात चार विभागवार रचनेनुसार पश्चिम चांदा विभागाचे पहिले उपसंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जगातील पहिली ६० एकर क्षेत्रात असलेली सागवान नर्सरी मसलेकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा येथे निर्माण केली. १९७८ मध्ये अहमदाबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये त्यांची प्राध्यापक आणि कार्यक्रम समन्वयक म्हणून नेमणूक झाली. तेथील सात तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट’ ही संस्था स्थापण्यात आली. येथे प्रशिक्षण कार्यक्रमांचे संपूर्ण काम डॉ. मसलेकरांनी पाहिले. नंतर पंतप्रधानांच्या आदेशानुसार ही संस्था भोपाळ येथे स्थापित झाली आणि वन-व्यवस्थापनात एक वेगळे पर्व सुरू झाले. याच काळात ‘गुजरात स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’ या संस्थेत त्यांनी अध्यापन केले. गुजरात विद्यापीठात त्यांनी संशोधनोत्तर पी.एच.डी. पूर्ण केली. १९८३ ते १९८५ दरम्यान चंद्रपूर येथे वनविकास महामंडळात प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून ते नियुक्त झाले. डॉ.मसलेकरांच्या प्रामाणिक आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे सर्वांमध्ये उत्साह निर्माण झाला. अलापल्ली विभागात जुन्या अयशस्वी रोपवनांना त्यांनी प्रयोगाद्वारे तरतरीत केले. लोहारा येथील हस्तकागद गिरणी चालू केली. कनारगाव (चंद्रपूर) आणि यामला (गडचिरोली) या ठिकाणी दोन वसाहतींतील एकूण १७० जुने येरवडा तुरुंगाचे कैदी होते, त्यांच्या समाजातील पुन:स्थापनेसाठी विशेष प्रयत्न केले. सर्व प्रदेशांत बिनतारी योजना कार्यान्वित केली. चांदा जिल्ह्याचे दोन जिल्हे झाले : चंद्रपूर आणि गडचिरोली; या जिल्ह्यांत प्रवेश केलेल्या नक्षलवादी चळवळीकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. या क्षेत्रात (एफ.डी.सी.एम.) ‘आगप्रतिबंधक’ योजना चालू केली. डॉ. मसलेकरांनी आलापल्ली येथे आदिवासींसाठी सुतारकाम प्रशिक्षण सुरू केले, तज्ज्ञांच्या सल्ल्याने अनेक उत्पादने व विक्रीही सुरू केली. या दोन वर्षांत आदिवासी भागात डॉ. मसलेकरांनी लक्षणीय सुधारणा केल्या. त्यांनी १९८७ मध्ये वनमंत्रालयात वनसहसचिव म्हणून काम पाहिले, त्यानंतर त्यांची वन आणि महसूल विभागांत नियुक्ती करण्यात आली. डॉ. मसलेकरांच्या पुढाकाराने वनविभागात संगणकाचा वापर करण्याची योजना अमलात आली. मसलेकरांच्या या कामगिरीबद्दल त्यांना पुढे सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. १९८८ ते १९९१ मध्ये बंगळुरू येथे त्यांनी केंद्राचे पहिले प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक म्हणून काम पाहिले. यात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, केरळ, तामीळनाडू आणि लक्षद्वीप या राज्यांत त्यांनी वनाधिकारी म्हणून काम पाहिले. याच काळात ‘सार्क’च्या वनसंशोधन तज्ज्ञांच्या बैठकीसाठी श्रीलंकेत भारताचे प्रतिनिधी म्हणून डॉ. मसलेकरांची निवड झाली. १९९१ मध्ये त्यांची महाराष्ट्राच्या सामाजिक वनीकरण संचालनालयात संचालक म्हणून नेमणूक झाली. १९९३मध्ये डॉ.मसलेकरांची महाराष्ट्राचा मुख्य वनसंरक्षक म्हणून नेमणूक झाली. १९६० मध्ये डॉ. आनंद मसलेकरांनी बॉम्बे फॉरेस्ट मॅन्युअलच्या कामासाठी एका वनसंरक्षकाची नेमणूक शिल्पकार चरित्रकोश ३११