पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मसलेकर, आनंद रामचंद्र प्रशासन खंड ‘भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे नावाजली गेली होती. त्यांचे आत्मचरित्र ‘रेमिनिसेन्सेस अ‍ॅण्ड रिफ्लेक्शन्स’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. - प्रभाकर करंदीकर

मसलेकर, आनंद रामचंद्र मुख्यवनसंरक्षक,महाराष्ट्रराज्य २६ सप्टेंबर १९३६ आनंद रामचंद्र मसलेकर यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्यांचे वडील रामचंद्र मसलेकर हे हैद्राबाद येथे दिवाणी न्यायाधीश होते. आनंद मसलेकर यांचे प्राथमिक शिक्षण अहमदनगर येथे झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. १९५२ ते १९५७ या काळात त्यांनी पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात बी.एस्सी.पर्यंतचे पदवी शिक्षण घेतले. याच कालावधीत त्यांनी हिंदी (प्रवीण) या विषयातील ज्ञान मिळविले. १९५७ मध्ये महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेत त्यांचा सहभाग होता. त्यानंतर १९५८ ते १९६१ या कालावधीत त्यांनी डेहराडून येथील ‘इंडियन फॉरेस्ट महाविद्यालया’त पदव्युत्तर शिक्षण घेतले. येथे साठ जणांच्या बॅचमध्ये त्यांचा पाचवा क्रमांक आला. डॉ. मसलेकर ‘बॉम्बे पब्लिक सर्व्हिस कमिशन’च्या निवड चाचणी परीक्षेत सर्वप्रथम आले. १९६० मध्ये डॉ.मसलेकरांची पुणे येथे पहिली नियुक्ती झाली. १९६२ ते १९६३ या काळात त्यांनी जोधपूरच्या ‘ए.झेड.आर.आय.’ या संस्थेत चार महिन्यांचा ‘एअर फोटो इंटरप्रिटेशन’ या विषयाचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला. तसेच १९६५ ते १९६६ मध्ये डेहराडून येथेदेखील ‘इंडियन फोटो इंटरप्रिटेशन’ या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर ‘आय.पी.आय’ या संस्थेत ‘इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर अर्थ सायन्स’ या विषयात त्यांनी एका वर्षाचा पदव्युत्तर प्रशिक्षण कोर्स केला. संपूर्ण वर्गात ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले होते.

पुढे १९६९ ते १९७१ या काळात नेदरलँड येथे जाऊन त्यांनी याच विषयात एम.एस्सी पदवी प्राप्त केली. या विषयात ही पदवी घेणारे मसलेकर हे पहिले वनाधिकारी होते. त्यानंतर जर्मनी, ऑस्ट्रिया या देशांत त्यांनी काम केले. १९८१ मध्ये ‘बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड मार्केटिंग’ या विषयात त्यांनी गुजरात विद्यापीठातून पी.एच.डी. केली. १९८९ मध्ये बंगळुरू येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज’ येथून मसलेकर यांनी दहा आठवड्यांचा प्रशिक्षण कोर्स  केला. त्यानंतर मद्रासच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’ या संस्थेचा ‘ए.आय.बी.एम’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला.

१९८५ ते १९८७ या काळात केंद्र सरकारतर्फे ‘बिझनेस मॅनेजमेंट’ या विषयातील अभ्यासक्रम वनाधिकार्‍यांसाठी अनिवार्य केला होता. डॉ.मसलेकर यांनी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यात समन्वयक आणि अध्यापक म्हणून काम केले. त्यांनी पुणे, राजपिपला आणि जोधपूर येथे तीन अभ्यासक्रम सत्रे घेतली. डॉ.मसलेकर यांनी विदर्भातील आठ जिल्ह्यांत कामे केली. नागपूर येथे त्यांनी साहाय्यक वनसंवर्धन अधिकारी म्हणून काम पाहिले. १९६३मध्ये त्यांनी नरनाळा किल्ला पर्यटनासाठी विशेष योजना तयार केली. १९७२ ते १९७४मध्ये डेहराडून येथे ‘प्री-इन्व्हेस्टमेंट सर्व्हे ऑफ फॉरेस्ट’ या संस्थेत त्यांनी ‘एअर फोटो अँड मॅपिंग’ या विषयावर काम पाहिले. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार आणि भूतान या प्रदेशांत मसलेकरांनी वनाधिकारी म्हणून काम केले. १९७३मध्ये भारताच्या परदेश मंत्रालयातर्फे तीन वनाधिकार्‍यांना भूतानमध्ये विशेषज्ञ म्हणून पाठविण्यात आले होते, त्यांत डॉ.मसलेकरदेखील म ३१० शिल्पकार चरित्रकोश