पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड पेटीगारा, कावसजी जमशेटजी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी

 १९६० साली पिंपुटकर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त झाले. मुंबईतील त्यांची कारकीर्द वादळी ठरली. ते मुंबईचे आयुक्त असताना मुंबई प्रदेश काँगे्रस हाउसचा कर न भरल्यामुळे त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या इमारतीवर जप्ती आणली. त्यामुळे त्यांची तेथून बदली करण्यात आली.  ४ सप्टेंबर १९६५ रोजी पिंपुटकर मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये मुख्य संचालक या पदावर रुजू झाले. या ठिकाणी त्यांनी २८ एप्रिल १९६८ पर्यंत यशस्वीपणे पदभार सांभाळला. पुढे १९७४ साली मा. इंदिरा गांधी यांनी पिंपुटकरांची केंद्रीय नियोजन आयोगाच्या सचिवपदी नेमणूक केली. १९७७ पर्यंत ते या पदावर होते.
 १९७७ साली आणीबाणीनंतर जनता पक्षाचे सरकार आले व मा.मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. मोरारजींनी पिंपुटकरांना प.बंगाल राज्याच्या राज्यपालांचे सल्लागार म्हणून पाठवले. त्या वेळी बंगालमध्ये अशांततेची परिस्थिती पिंपुटकरांनी कौशल्याने हाताळली. लवकरच १७ सप्टेंबर १९७७ रोजी मोरारजींनी पिंपुटकरांची नियुक्ती केंद्रीय दक्षता   आयोगाचे अध्यक्ष म्हणून केली. या पदावरून पिंपुटकर ३० एप्रिल १९८० रोजी सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर  पिंपुटकर सहा महिने दिल्लीचे हंगामी राज्यपाल होते.

राज्यपाल पदाची कारकीर्द संपल्यानंतर ते दिल्ली (गाझियाबाद) येथे स्थायिक झाले. या नि:स्पृह, प्रामाणिक, कठोर शिस्तीच्या प्रशासकाचा मृत्यू दिल्ली येथे झाला.

- संपादित

संदर्भ : १.‘देवरुखे ब्राह्मणाचा इतिहास’

पेटीगारा, कावसजी जमशेटजी पहिलेभारतीयडी.सी.पी.,प्रमुख-गुप्तहेरखाते जन्म-मृत्यू दिनांक अनुपलब्ध

 कावासजी जमशेटजी पेटीगारा हे गुप्तहेर खात्याचे पहिले भारतीय प्रमुख होते. त्यांचा सेवाकाळ १९०३-१९३८ होता. ते गुप्तहेर खात्यामध्ये सफेदवाला म्हणून ओळखले जात असत. १९२८मध्ये ते मुंबईचे उपायुक्त झाले. या पदावर त्यांनी दहा वर्षे काम केले. ते अत्यंंत प्रामाणिक अधिकारी होते. 
 महात्मा गांधीजींचा त्यांच्यावर विलक्षण विश्‍वास होता. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जेव्हा जेव्हा म. गांधीजींना अटक करण्यात आली तेव्हा ‘मी फक्त पेटीगारा यांच्याकडूनच अटक करून घेईन,’ अशी अट गांधीजींनी घातली होती. पेटीगारा हे मुंबईत सामान्य जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय अधिकारी होते. पेटीगारा यांनी जनतेची नाडी चांगली ओळखली होती. मुंबईतील मेट्रो चित्रपटगृहाजवळ जनतेच्या प्रयत्नांमधून त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्रावणकोरचे दिवाण रामस्वामी अय्यर यांनी पुढाकार घेऊन जनतेच्या सहकार्याने पेटीगारा यांचा पारशी डगल्यामधील उभा केलेला हा पुतळा आजही त्यांच्या शानदार कर्तृत्वाची आठवण करून देतो.

- संपादित

शिल्पकार चरित्रकोश २८७