पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पिंपूटकर, मोरेश्वर गजानन प्रशासन खंड मंत्रालयातून सचिव पदावरून १९८५मध्ये पाध्ये निवृत्त झाले. प्रचलित संकेतानुसार केंद्र शासनात सचिव पदावर भारतीय प्रशासन सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवारच नियुक्त होतात. पण माधव पाध्ये हे प्रशासन सेवा परीक्षेच्या बाहेरून आलेले पहिले सचिव होते. आपल्या प्रदीर्घ सेवेत सिंचनासंदर्भात भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून नेपाळ, श्रीलंका, भूतान, सिक्किम, बांगला देश आणि इतरही अनेक देशांत जाण्याची संधी त्यांना मिळाली होती.

- सुधाकर कुलकर्णी

पिंपुटकर, मोरेश्वर गजानन आय.सी.एस. सचिव, केंद्रीय नियोजन आयोग, आयुक्त मुंबई महानगरपालिका, अध्यक्ष-केंद्रीय दक्षता आयोग १९१६ - १९८६

 ‘एम.जी.पिंपुटकर म्हणजे पोलादी, कठोर, शिस्तप्रिय प्रशासक!’ पंतप्रधान मोरारजी देसाईंचे हे गौरवोद्गार सार्थ ठरवणारे मोरेश्वर गजानन पिंपुटकर हे तत्कालीन मुंबई प्रांतातील उंबरगावचे (आता गुजरातेत असलेल्या) मूळ रहिवासी होते. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई होते.

मोरेश्वर सात वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. लहानपणीच पितृछत्र हरवलेल्या मोरेश्वरचे पुढील संगोपन व शिक्षण त्यांचे चुलते व मामा यांच्याकडे झाले.

 त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. त्यानंतर ते आय.सी.एस. परीक्षेसाठी इंग्लंडला गेले. मोरेश्वर पिंपुटकर हे त्यांच्या समाजातील पहिले व ब्रिटिश राजवटीतील शेवटचे आय.सी.एस. अधिकारी बनून १९४०मध्ये मुंबई येथे परतले. पिंपुटकर आय.सी.एस. परीक्षादेखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १९४६ ते १९४९ या कालावधीत पिंपुटकर गुजरातमधील गोधरा येथे जिल्हाधिकारी होते. हा कालखंड म्हणजे भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडींचा काळ आहे. या कालखंडातच भारताला स्वातंत्र्य (१९४७) मिळाले. गोधर्‍याला या सर्व पार्श्वभूमीचा संदर्भ आहे.  
 गोधरा हे अतिशय संवेदनशील ठिकाण समजले जाते. येथे हिंदू-मुस्लीम दंग्यांचा मोठा इतिहास आहे. गोधर्‍यात पिंपुटकर जिल्हाधिकारी असताना मोठी दंगल झाली.  पिंपुटकरांनी मोठ्या धाडसाने व कौशल्याने दंगेखोरांना रोखले व जेरबंद केले. तेव्हापासून गोधर्‍यामध्ये पिंपुटकरांचा जबरदस्त दरारा निर्माण झाला. 
 गोधर्‍यातील काही समाजकंटक गणेशोत्सव मिरवणुकीला विरोध करत व मिरवणूक काढू देत नसत. पिंपुटकरांनी गणेश उत्सव पुन्हा सुरू केला. काही लोकांना हे आवडले नाही, पण पिंपुटकरांनी निषेध व्यक्त करणार्‍यांना प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवला आणि तेव्हापासून गणेशोत्सवाची मिरवणूक वाजतगाजत, मोठ्या आनंदाने काढण्यास सुरुवात झाली. पिंपुटकरांच्या या अजोड कार्यामुळे दरवर्षी पिंपुटकरांच्या प्रतिमेस हार घालून मिरवणुकीची सुरुवात होते. पिंपुटकरांची गोधरामधील कारकीर्द खूपच जोखमीची व धाडसाची होती. गोधरातील सट्टेबाज, गुन्हेगार, दंगेखोर समाजकंटक पिंपुटकरांना जबरदस्त घाबरत असत. या त्यांच्या कामाची लोकप्रियता एवढी होती, की गोधर्‍यातून त्यांची बदली झाल्यानंतर तेथील मुख्य चौकाचे नामकरण ‘एम.जी. पिंपुटकर चौक’ असे करण्यात आले.
 गोधर्‍याहून त्यांची नियुक्ती अहमदाबाद येथे अन्नधान्य वाटप आयुक्त (फूड कमिशनर) म्हणून करण्यात आली. या ठिकाणीदेखील त्यांनी तडफदार वृत्ती दाखवून साठेबाजी, काळाबाजार करणार्‍या व्यापार्‍यांंवर कडक कारवाई करून अन्नधान्य वाटपाची उत्तम व्यवस्था लावली.

प शिल्पकार चरित्रकोश