पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड परांजपे, वसंत वासुदेव प्रकरणातील परिस्थिती विशद केली व संबंधित प्राध्यापकास पदोन्नती योग्य कारणास्तव नाकारली हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच जर कारवाई करावयाची असेल, तर ती प्रथम त्यांच्याविरुद्ध परखडपणे करा असे सांगितले. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात परांजपे यांचे म्हणणे पटले व प्रकरण योग्य तर्‍हेने हाताळल्याबद्दल शिक्षण विभागाची प्रशंसा केली.

 मुख्य सचिवपदी असताना, कै.पांडुरंग जयराव चिन्मुळगुंद, आय.सी.एस. यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या चिन्मुळगुंद ट्रस्टतर्फे प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ प्रशासकांना दिला जाणारा चिन्मुळगुंद पुरस्कार १९८९ मध्ये त्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
 सेवानिवृत्तीच्या नियमानुसार ते मुख्य सचिव या पदावरून ३० सप्टेंबर १९८८ रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्या सुमारास त्यांच्या सुविद्य पत्नी रजनी परांजपे यांना ‘इंटरनॅशनल सोशल वेल्फेअर’ या विषयासाठी अतिथी प्रोफेसर म्हणून शिकोकू ख्रिश्चन विद्यापीठ, जपान येथून बोलावणे आले होते. तेथे त्यांना सप्टेंबर १९८८ च्या पहिल्या आठवड्यात रुजू व्हावयाचे होते. त्यांच्यासमवेत जपानला जाता यावे म्हणून परांजपे यांनी सेवानिवृत्तीच्या एक महिना आधीच म्हणजे ३१ ऑगस्ट १९८८ रोजी सेवानिवृत्ती घेतली. 
 जपानमधून वर्षभराने परत आल्यानंतर रजनी परांजपे यांना जपानमध्येच कायमस्वरूपी प्राध्यापक  म्हणून  नेमणूक मिळाली. या वेळीदेखील परांजपे दाम्पत्य जपानला गेले. जपानमधील वास्तव्यात परांजपे यांनी जपानमधील सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवस्थेचा सर्वंकष अभ्यास केला व ‘जपान, अ जायंट इन डिस्ट्रेस’ हे माहितीपूर्ण पुस्तक लिहिले. ते दिल्ली येथील ‘अजंठा बुक्स इंटरनॅशनल’ या प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 जपानच्या वास्तव्यात परांजपे यांनी शिकोकू विद्यापीठात ‘पीस फिलॉसॉफी ऑफ गांधी’ या विषयावर अनेक व्याख्याने दिली. परांजपे यांनी सेवानिवृत्तीनंतर पुण्यात वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला.

पुणे शहराच्या विकासासाठी कृती आराखडा करण्याकरिता त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती (परांजपे समिती) नेमण्यात आली होती. सदर समितीने पुणे शहराच्या वाहतूक, कचरा, रस्ते, पाणीपुरवठा या समस्यांच्या संदर्भात अभ्यास करून महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या. - श्रीधर जोशी

परांजपे, वसंत वासुदेव राजदूत - चीन,कंबोडिया १९२४ - ८ एप्रिल २०१०

 भारताच्या चीनबरोबरच्या परराष्ट्रधोरणावर स्वातंत्र्यानंतर साधारणत: अडीच दशके महत्त्वपूर्ण ठसा उमटवणारे मराठी अधिकारी म्हणजे वसंत वासुदेव परांजपे.

वसंत परांजपे यांचे शालेय शिक्षण पुणे येथे झाले. मॅट्रिकमध्ये त्यांना ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती मिळाली होती.

 त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात झाले. बी.ए.ला असताना त्यांना ‘भाऊ दाजी लाड’ शिष्यवृती मिळाली.
 व्याकरण या विषयात पुणे विद्यापीठातून एम.ए. करत असताना ते प्रथम श्रेणी मिळवून विद्यापीठात प्रथम आले.
 भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ व्हावेत या उद्देशाने पंडित नेहरू यांनी विद्यार्थी एक्स्चेंज कार्यक्रम तयार केला. या कार्यक्रमांतर्गत चीनमध्ये विविध विषयांचे शिक्षण घेण्यासाठी दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार 

शिक्षण पुणे शिल्पकार चरित्रकोश २८३