पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परांजपे, केशव गणेश प्रशासन खंड पेट्रोल व नैसर्गिक वायू राज्याचे विक्रीकर आयुक्त होते. त्यांच्याकडून त्यांना खूप शिकावयास मिळाले.

 त्यानंतर त्यांची नाशिकच्या जिल्हाधिकारी या पदावर नेमणूक झाली. जिल्हादंडाधिकारी या नात्याने जिल्ह्यातील कायदा व सुलभ व्यवस्था यांची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. मालेगाव हे अत्यंत संवेदनशील शहर नाशिक जिल्ह्यातच आहे. जातीय दंगलींनी अनेक वेळा हे शहर होरपळून निघालेले आहे. त्यामुळे हिंदू व मुस्लिमांच्या धार्मिक सणांच्या वेळी जिल्हा प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागत असे. १९६३ मधील गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार होऊ नयेे म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली होती. तरीदेखील अनंतचतुर्दशीच्या दिवशी निघालेल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने शहरात दंगल उसळली. दंगल आटोक्यात यावी यासाठी जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशावरून पोलिसांनी गोळीबार केला. त्यात चार-पाच माणसे मृत्युमुखी पडली. 
 पुढे या प्रकरणात राज्यशासनाने चौकशी केली. पोलिसांनी केलेला गोळीबार समर्थनीय होता असा निष्कर्ष चौकशी अहवालात काढला गेला व जातीय दंगल समर्थपणे हाताळल्याबद्दल जिल्हादंडाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांचे राज्यशासनातर्फे कौतुक करण्यात आले. नाशिकनंतर त्यांनी बुलढाणा व मुंबई येथे जिल्हाधिकारी या पदावर काम केले. मुंबईचे जिल्हाधिकारी असताना देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. मुंबई  शहरातील निवडणुका शांतपणे व सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ती त्यांनी समर्थपणे पार पाडली. त्यानंतर त्यांनी केंद्रशासनाच्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या पेट्रोलियम मंत्रालयात उपसचिव म्हणून पाच वर्र्षे काम केले. 
 केंद्रशासनातील प्रतिनियुक्तीवरून आल्यावर मंत्रालयात सहसचिव, विभागीय आयुक्त, मुंबई, सचिव (महसूल), सचिव (शिक्षण), सचिव (सामान्य प्रशासन विभाग), सचिव (नियोजन) या महत्त्वाच्या पदांवर काम केेले. पुढे त्यांची केंद्रशासनाच्या नियोजन मंडळाचे सल्लागार म्हणून नेमणूक झाली. तेथे त्यांनी दोन वर्षे काम केले. महाराष्ट्रात परत आल्यावर त्यांनी पुन:श्च सचिव (नियोजन) या महत्त्वाच्या पदाची धुरा सांभाळली. याच काळात त्यांनी डॉ.एस.एच. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जिल्हा नियोजन’ या विषयावर प्रबंध लिहिला व मुंबई विश्वविद्यालयातून पीएच.डी. मिळवली.
 सचिवपदावर असताना,  राज्यकर्त्यांना न रुचणारे असले तरी आपले मत परखडपणे व स्पष्टपणे नोंदविणारे म्हणून परांजपे यांची ख्याती होती. ‘मुख्यमंत्रिपदावर असताना शासनाची जमीन सवलतीने घेणे उचित ठरणार नाही’, असा परखड सल्ला त्यांनी एका मुख्यमंत्र्यांना दिला होता. तो सल्ला त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी मानला एवढेच नव्हे, तर परांजपे यांना त्याबद्दल धन्यवाद दिले. 
 तसेच एका प्राध्यापकाला पदोन्नती नाकारली म्हणून तक्रार आल्याने त्या वेळचे मुख्यमंत्री प्रक्षुब्ध झाले होते व सबंध शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करावी असा त्यांचा मानस होता. त्या वेळी परांजपे शिक्षण विभागाचे सचिव होते. परांजपे यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे जाऊन 

२८२ शिल्पकार चरित्रकोश