पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दोशी, ललित नरोत्तम प्रशासन खंड प्रयत्न केला आणि अधीनस्थ त्यांच्याकडे मार्गदर्शन व सल्ला विचारण्यासाठी मोकळेपणाने येत.

 सर्वसामान्यांच्या दृष्टीने ललित असे समर्थ प्रशासक होते, की लालफितीला बाजूला सारून ते स्वत: मदत करीत असत. त्यांनी मुख्यत: औद्योगिक व नागरी विकास विभागात काम केले आणि शहरी कमाल जमीन धारणा कायद्याला (अर्बन सीलिंग अ‍ॅक्ट) व्यावहारिक बनवून विकास कार्याला गतिमान केले व त्यांच्या या कामगिरीचे कौतुक झाले. देशात पेट्रोकेमिकल्स उद्योगाच्या विकासासाठी धोरण निर्धारित करण्याशी ते निगडित होते. कार्यक्षम, परिश्रमी, इमानदार व सेवाभावी ललित  दोशी यांना भ्रष्टाचाराचा कधी स्पर्श झाला नाही. हा निरभिमानी प्रशासक नियमांचे कटाक्षाने पालन करी; पण रचनात्मक कार्यात कधी बाधा पडू देत नसे. ललित मितभाषी, सदाचारी, विनीत वृत्तीचे असून अर्थशास्त्रीय प्रशासनात त्यांचे बहुमूल्य योगदान स्मरणीय राहिले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या सोबत औद्योगिक धोरणाविषयी माहिती देण्यासाठी १९९४ मध्ये उद्योग सचिव या नात्याने ललित दोशी स्वित्झर्लंड येथे गेले असताना त्यांचे अकस्मात निधन झाले. 

- अरुण बोंगिरवार/भरत दोशी

२७८ शिल्पकार चरित्रकोश