पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड दोशी, ललित नरोत्तम काम करायचे नव्हते. त्या दृष्टीने जे.आर.डी. टाटा यांच्याशी त्यांचे बोलणे झाले. त्यांच्या समूहातर्फे चालणार्‍या सामाजिक कार्यातच केवळ लक्ष घालण्याचे देशमुखांनी मान्य केले आणि टाटा मंडळींनी तो शब्द कायमचा पाळला.

 मूळचे पुणेकर असलेले देशमुख १९६१ पासून मुंबईला स्थायिक झाले आणि त्यांनी स्वत:चे घर बांधले. अधूनमधून ते तेथे राहू लागले. त्या दरम्यान त्यांचा अनेक सांस्कृतिक संस्थांशी संबंध आला. जात्याच साहित्य व कला यांची आवड असल्याने एशियाटिक सोसायटी, मॉडर्न आर्ट गॅलरी अशा संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले. प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम, अग्नी वगैरे अनेक संस्थांशीही ते संबंधित आहेत. त्यांचे स्नेही डॉ. शरच्चंद्र गोखले यांच्या सूचनेवरून कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्रॅम (कास्प) या संस्थेशी त्यांचा संबंध आला आणि आज ते या संस्थेचे नेतृत्व करीत आहेत. 

- सविता भावे

दोशी, ललित नरोत्तम उद्योग सचिव, महाराष्ट्र राज्य सिकॉमचे प्रबंध संचालक ४ ऑगस्ट १९४२ - ३० जानेवारी १९९४

 ललित नरोत्तम दोशी यांचा जन्म कच्छ (गुजरात) मधील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कांताबेन. कमी शिकलेल्या आई-वडिलांची इच्छा आपली तिन्ही मुले उच्चशिक्षित व्हावी अशी असल्याने ते मुंबईला आले. शिक्षणासाठी बोरीबंदरजवळ त्यांच्या मित्राच्या लहानशा घरात ते राहिले. ललितचे शालेय शिक्षण भरडा न्यू हायस्कूलमध्ये झाले. सेंट झेवियर्स महाविद्यालयातशिकून त्यांनी मुंबई विद्यापीठ येथून अर्थशास्त्रातील एम.ए. ही पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली.त्यांनीमुंबईच्या जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची पदविका मिळविली. यापुढे त्यांनी युनायटेड किंगडमच्या लीड्स युनिव्हर्सिटीची मॅनेजमेंट ऑफ पब्लिक एण्टरप्रायझेस ही परीक्षा दिली. 
 ललित दोशी यांनी १९६६मध्ये वयाच्या चोविसाव्या वर्षी उच्च शिक्षण पूर्ण होताच प्रशासनिक सेवेत पदार्पण केले. आपल्या सव्वीस वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी महाराष्ट्र शासन, तसेच केंद्र शासनाच्या अधीन महत्त्वपूर्ण पदांवर काम केले. यांत महाराष्ट्र औद्योगिक विकास निगमचे (एम.आय.डी.सी.) मुख्य कार्यकारी अधिकारी, हाउसिंग, संस्थात्मक वित्त आणि नियोजन (इन्स्टिट्यूशनल फायनान्स अ‍ॅण्ड प्लॅनिंग) विभागात सचिव, महाराष्ट्र राज्य औद्योगिक आणि गुंतवणूक महामंडळाचे (स्टेट इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, सिकॉम) प्रबंध संचालक व महाराष्ट्र शासन (उद्योग) खात्याचे सचिव (१९९२ ते १९९४) यांचा आणि नंतर १९८५ ते १९९० पर्यंत भारत सरकारच्या पेट्रोकेमिकल्स मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून झालेल्या नेमणुकांचा समावेश होतो.
 वरिष्ठ पदांवर ललित यांच्या नेमणुका आणि भारत सरकारने अचानक अवलंबलेल्या आर्थिक उदारीकरण नीती या घटना एकाच वेळी घडत गेल्या. सर्व पदांवर परिश्रम आणि निष्ठापूर्वक कार्यरत असताना आपल्या पदाचा विचार न करता जे-जे कोणी त्यांच्याकडे आले, त्यांना मदत करण्याचा ललित यांनी सदैव

शिल्पकार चरित्रकोश २७५७