पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देशमुख, चिंतामण द्वारकानाथ प्रशासन खंड आणि रिझर्व्ह बँकेतून प्रत्यक्ष शेतकर्‍यांपर्यंत कर्ज पोहोचण्याची यंत्रणा तयार झाली. जुलै १९४४ मध्ये ब्रेटन वुड्स परिषद झाली. या परिषदेत सी.डी. देशमुखांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. या परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणे निधी(इंटरनॅशल मॉनिटरी फंड) आणि आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास अधिकोष (इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) या दोन संस्था स्थापन करण्याचा निर्णय झाला. विकसनशील देशांसाठी या दोन्ही संस्था महत्त्वाच्या ठरल्या. डॉ. सी. डी. देशमुख या दोन संस्थांच्या संचालक मंडळाचे दहा वर्षे सदस्य होते. १९५० मध्ये या दोन्ही संस्थांच्या झालेल्या वार्षिक बैठकीत सी. डी. देशमुखांनी अध्यक्षस्थान भूषवले होते. सप्टेंबर १९४९ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सी.डी. देशमुख यांची अमेरिका आणि युरोप या देशांचा विशेष वित्तीय राजदूत म्हणून नेमणूक केली. त्या वेळी सी.डी. देशमुख यांनी गव्हाच्या कर्जासाठी अमेरिकेशी वाटाघाटी केल्या होत्या. १ एप्रिल १९५० रोजी नियोजन आयोगाची स्थापना झाली आणि नेहरूंनी त्यांची या आयोगावर सदस्य म्हणून नेमणूक केली. त्यानंतर लगेचच स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सलग सहा वर्षे त्यांनी देशाचे वित्तमंत्री म्हणून धुरा वाहिली. त्यानंतर नेहरूंशी मतभेद झाल्यामुळे जुलै १९५६ मध्ये वित्तमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला. वित्तमंत्री असताना त्यांनी दोन पंचवार्षिक योजनांची आखणी केली आणि त्यांच्या कारकिर्दीत एका पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी झाली. ते वित्तमंत्री असताना वित्तीय सुधारणा होण्यासाठी नवा कायदा तयार झाला होता. हा कायदा तयार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. इंपिरिअर ऑफ इंडिया या बँकेचे राष्ट्रीयीकरण याच दरम्यान झाले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया या नावाने ही बँक रूढ झाली. त्यांच्याच कार्यकाळात खाजगी विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि आयुर्विमा महामंडळाची स्थापना झाली. १९५६ मध्ये वित्तमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सी.डी. देशमुख यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले. १९५६ ते १९६० या काळात त्यांनी देशभरातल्या विद्यापीठीय शिक्षणात सुधारणा केल्या. १९६२ ते १९६७ या काळात त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळले. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रांत काम करणार्‍या अनेक संस्थांच्या २७४ शिल्पकार चरित्रकोश