पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड देशमुख, भालचंद्र गोपाळराव उभारणीत त्यांचा वाटा मोठा होता. भारतीय सांख्यिकी संस्था (इंडियन स्टॅटिस्टिक इन्स्टिट्यूट (आयएसआय) या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि १९४५ ते १९६४ पर्यंत या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. याच दरम्यान ते वित्तमंत्रीही होते तेव्हा १९५१-१९५२ या वर्षी भारतीय सांख्यिकी संस्थेमार्फत राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची सुरुवात झाली.

 भारताच्या संस्कृतीची माहिती जगभरात  पोहोचावी या उद्देशाने सी.डी. देशमुख यांनी साली ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ची स्थापना केली. या  संस्था निर्माण झाल्यापासून ते तहहयात या संस्थेचे ते अध्यक्ष होते.
 १९५७ ते १९६० या कालावधीत ते ‘नॅशनल बुक ट्रस्ट’चे मानद अध्यक्ष झाले. १९६३-६४ या वर्षी दिल्लीच्या भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्थेचे आणि १९६५ ते १९७४ या कालावधीत ते आर्थिक विकास संस्थेचे अध्यक्ष होते. १९५९ ते १९७३ या कालावधीत देशमुख हैदराबादच्या प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयाच्या संचालक मंडळाचे प्रमुख होते. त्यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख या ‘आंध्र महिला सभा’ या समाजसेवी संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष होत्या. या संस्थेच्या माध्यमातून आपल्या पत्नीसह सी.डी.देशमुख यांनी साक्षरता प्रसार, कुटुंबनियोजनासारख्या सामाजिक कार्यात भाग घेतला होता. १९४४मध्ये ब्रिटिश सरकारने ‘सर’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला. १९५२ मध्ये केम्ब्रिजमधल्या जीजस महाविद्यालयाने माजी विद्यार्थी सी.डी. देशमुख यांना भारतीय आंतरराष्ट्रीय वित्त आणि व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल ‘ऑनररी फेलो’ हा सन्मान दिला. 
 १९५९मध्ये त्यांनी सरकारी सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे फाउण्डेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला. सी.डी.देशमुख यांना संस्कृत भाषेची आवड होती. १९६९मध्ये त्यांचा संस्कृत भाषेतील कवितांचा काव्यखंड प्रकाशित झाला होता. १९७५मध्ये भारत सरकारने देशमुख यांना ‘पद्मविभूषण’ देऊन गौरविले.
 अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ प्रिन्स्टन, लंडनमधील लाइस्टर, पुणे विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ आणि ओस्मानिया विद्यापीठ, तसेच भारतीय सांख्यिकी संस्था या संस्थांनी डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. 
 आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रशासकीय, वित्तीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अनमोल कार्य केले. तत्त्वनिष्ठता आणि वस्तुनिष्ठता, विज्ञान-संस्कृती, काल्पनिकता, समर्पकता आणि प्रामाणिकपणा अशा आगळ्यावेगळ्या गुणधर्मांमुळे सी.डी. देशमुख यांनी असाध्य गोष्टी साध्य केल्या आणि स्वत:ची ओळख जगभरात निर्माण केली.

- नितीन केळकर

देशमुख, भालचंद्र गोपाळराव केंद्रीयकॅबिनेटसचिव,आयुक्त-मुंबईम.न.पा. अतिरिक्तसचिव-केंद्रीयगृहखाते २६ मार्च १९२९

 भालचंद्र गोपाळराव उपाख्य बी.जी. देशमुख यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. भालचंद्र देशमुख त्यांचे वडील सांगलीला शेतकी खात्यात नोकरीला होते. १९३६मध्ये भालचंद्र देशमुख पुण्याला आले आणि त्यांचे नाव नूतन मराठी विद्यालयात घालण्यात आले. तेथे त्यांच्या जीवनाचा पायाच घातला गेला. देशमुखांचा इंग्रजी हा विषय चांगला आहे हे हेरून त्या विषयाचे सखोल ज्ञान मिळविण्यास मुख्याध्यापक ना.ग.नारळकर यांनी त्यांना प्रवृत्त केले. त्यांच्या प्रेरणेतून इंग्रजी भाषेवर मिळविलेल्या प्रावीण्याच्या 

शिल्पकार चरित्रकोश २७५