पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड देवरे, सुधीर तुकाराम इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर श्रीलंका, बांगलादेश, मालदीव व म्यानमार या शेजारी देशांबरोबरचे नाजूक संबंध हाताळले होते.

 त्यांची दक्षिण कोरियामध्ये १९८५ साली राजदूत म्हणून पहिली नेमणूक झाली. त्या वेळी भारत आणि कोरिया यांचे संबंध फार जुजबी स्वरूपाचे होते. ‘बुद्धाचा देश’ हीच भारताची प्रतिमा तोपर्यंत कोरियात होती. १९८५ ते १९८९ या काळातील देवरे यांच्या वास्तव्यात भारत-कोरिया संबंधांचा पूर्ण आराखडा तयार झाला. ह्युन्देई, देऊ, सॅमसंग ह्या कंपन्यांची नावे आज भारताच्या घराघरांमध्ये पोहोचली आहेत. त्या संबंधांची पायाभरणी त्या काळात झाली. कोरियामध्ये लोकशाही आली. आशियाई खेळ व ऑलिम्पिक्स त्याच काळात झाले. त्या सर्वांच्या व्यवस्थापनात राजदूताची भूमिका आणखी महत्त्वाची झाली. १९८९ ते १९९२ या कालावधीत फ्रँकफर्टला काउन्सिल जनरल असण्याचा अनुभव आणखीनच वेगळा. जर्मनीमधल्या व्यापार संबंधात औद्योगिक प्रदर्शनांचा भाग मोठा असे. भारतातल्या उद्योजकांना प्रोत्साहन देऊन जर्मनीत त्यांचा सहभाग वाढवण्याची कामगिरी काउन्सिल जनरलची असायची. दोन्ही जर्मनींचे एकीकरण झाल्यावर ही जबाबदारी वाढली. 
 पुढे सोव्हियत युनियनची शकले झाली आणि १९९२ साली युक्रेन या स्वतंत्र देशाचा पहिला राजदूत म्हणून सुधीर देवरे यांची नेमणूक झाली. नव्याने राजनैतिक संबंध निर्माण करणे हे काम दुर्गम  तसेच आव्हानात्मक होते. युक्रेनबरोबर आर्मेनिया आणि जॉर्जिया या देशांच्या राजदूतपदाची जबाबदारीही त्यांना सांभाळायची होती. दूतावासाची उभारणी हा अनुभव अनोखा व त्यातून चेर्नोबिलचा बागुलबुवा भेडसावणार्‍या कीव्हसारख्या ठिकाणी तो उभारणे आणि दूतावासाचे मनोबल कायम ठेवणे याचाही ताण होता. दोन वर्षांत संबंधांना जेव्हा स्थिरता आली. राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांची युक्रेन भेट, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पातॉन यांची भारतभेट आणि युक्रेन शेअरची भारताला येण्याची सुरुवात या देवरेंच्या तेथील वास्तव्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना होत्या. देवरे यांनी सातत्याने सरकारबरोबर राजनैतिक संवाद साधून भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधील विद्यापीठात मोफत शिक्षणाच्या सवलती परत मिळवून दिल्या. त्यामुळे जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, वैद्यकीय शास्त्र इत्यादी विषयांत आपले शिक्षण पूर्ण करणे शक्य झाले.

शिल्पकार चरित्रकोश २७१