पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ स ५ है 11 , A IIIIIIII शीट करना है ।। Tu 200PLEAF प्रशासन खंड देवकुळे, श्रीकांत त्र्यंबक महाविद्यालयामार्फत भारतातील (वित्तीय/ बँकिंग) क्षेत्रातील अनेक अधिकार्‍यांना प्रशिक्षित करून बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा हेतू त्यांनी पूर्णत्वास नेला. कोणत्याही संस्थेचा विकास हा शिक्षण, प्रशिक्षण आणि नियोजनाशिवाय होऊ शकत नाही यावर त्यांचा कटाक्ष आहे.

 कर्नाटकच्या ‘मलप्रभा’ व ‘घटप्रभा’ या प्रकल्पांचे प्रशासक असताना त्यांनी ‘कमांड एरिया डेव्हलपमेंट’साठी पाणीपुरवठ्याची पुरेपूर क्षमता यावी म्हणून अनेकमुखी कार्यक्रमांची रचना केली. बेळगावचे आयुक्त असताना डॉ. दुभाषींनी मराठी व कानडी लोकांमध्ये समन्वयाची चांगली भूमिका पार पाडली. बेळगाव शहराला चांगला आकार यावा आणि या शहराचे वैभव वाढावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. कर्नाटक सरकारचे मुख्य सचिव या नात्याने राज्याच्या कार्याला त्यांनी गती दिली. कर्नाटक सरकारच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध योजना आखून त्या त्यांनी राबविल्या. रस्ते, पूल, धरणे, शहरांचे सुशोभीकरण, बागा, यांचे विस्तारीकरण केले.
 १९८० च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आसाममध्ये कृषी अर्थरचनेचा विकास करायची निकड भासली, तेव्हा त्यांनी डॉ. दुभाषींसारख्या प्रदीर्घ अनुभव असलेल्या अधिकार्‍यास विशेष प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. पुढे राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनीही त्यांच्यावर अनेक जबाबदार्‍या टाकल्या. भारत सरकारच्या शेती, सहकार व पंचायतराज या खात्याचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सरकारच्या ध्येयधोरणाची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे कशी राबविली जाईल याबाबत ते दक्ष असत. भारतातील प्रशासकीय अधिकार्‍यांना अधिक गतिमान करण्यासाठी त्यांनी सरकारच्या ध्येयधोरणानुसारच प्रशिक्षणाची योजना आखून तशी व्यवस्था केली. अधिकारी अधिक द्रष्टा व्हावा व त्याच्या कामात गती यावी, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. 
 भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त होऊन आज ३७ वर्षे झाली तरी अनेक सार्वजनिक संस्थांना त्यांचे थेट मार्गदर्शन लाभत आहे. केंद्र सरकारच्या अनेक तज्ज्ञ समित्यांचे नेतृत्व त्यांच्याकडे येत असतेच. गोवा विद्यापीठाच्या उभारणीत त्याचा सिंहाचा वाटा आहे.  येथे पाच वर्षे कुलगुरू म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. अभ्यासक्रम, शैक्षणिक दर्जा यांमध्ये त्यांनी आधुनिकपणा आणला. ज्ञान, विज्ञान यांमध्ये विद्यार्थ्यांत पारंगतता यावी व आपले विद्यार्थी जागतिक क्षेत्रात पुढे यावेत अशा प्रकारचे शिक्षण विद्यापीठातून दिले जावे यासाठी गोवा विद्यापीठात नवे धोरण आखले आणि भारतात या विद्यापीठाला त्यांनी नवा दर्जा प्राप्त करून दिला.
 डॉ. पद्माकर रामचंद्र दुभाषी असे एक चतुरस्र, अनुभवी, विद्वानमान्य शिक्षणतज्ज्ञ; शेती, सहकार, अर्थनियोजन व कलात्मक प्रशासक अधिकारी म्हणून सार्‍या भारतभर ज्ञात आहेत. सध्या ते भारतीय विद्या भवन, पुणे केंद्राचे अध्यक्षपद भूषवीत आहेत.

- जयराम देसाई

देवकुळे, श्रीकांत त्र्यंबक मुख्य अभियंता, सहसचिव, प्रधान सचिव -पाटबंधारे विभाग २१ ऑगस्ट १९३५ - ६ जानेवारी २०१० श्रीकांत त्र्यंबक देवकुळे यांचा जन्म जोधपूर येथे झाला. देवकुळे घराणे मूळचे वाईचे होते. श्रीकांत यांचे वडील राजस्थानातील जोधपूरच्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षणही जोधपूरलाच झाले. पुढे देवकुळे शिल्पकार चरित्रकोश २६७