पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुभाषी, पद्माकर रामचंद्र प्रशासन खंड दुभाषी, पद्माकर रामचंद्र संस्थापक संचालक - वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार प्रबंध संस्था, पहिलेप्राचार्य-कृषीवित्तीयमहाविद्यालय(पुणे) ७ मार्च १९३०

 भारतीय प्रशासकीय सेवेतील एक नामवंत प्रशासक अधिकारी, विद्वान शिक्षणतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक व लेखक पद्माकर रामचंद्र तथा पी.आर. दुभाषी आजही सहकार, शिक्षण व अर्थशास्त्रीय विषयावर लेखन करीत आहेत. पुण्यातील राष्ट्रीय स्तरावरची अधिकार्‍यांना शिक्षण  प्रशिक्षण देणार्‍या आणि संशोधन करणार्‍या वैकुंठ मेहता राष्ट्रीय व प्रबंध संस्थानचे ते संस्थापक व पहिले संचालक आहेत.
 भारतीय प्रशासकीय सेवेतील एक ज्येष्ठ अधिकारी असताना भारत सरकारच्या ध्येयधोरणाला त्यांनी विशेष चालना दिली आहे. भारत सरकारने २०१० मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
 डॉ. पी.आर. दुभाषी तत्कालीन महाराष्ट्र, गुजरात, व कर्नाटक प्रदेशासाठी असणार्‍या मुंबई विद्यापीठाच्या एम.ए.परीक्षेत प्रथम आले, कृषि व ग्रामीण विकासात स्वातंत्र्यानंतरचे कार्य’ या विषयामध्ये त्यांनी पीएच.डी. मिळविली. मुंबई विद्यापीठाचा ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ हा बहुमान त्यांना ‘नियोजनासंबंधीची मूलभूत व्यवस्था-चौकट’ या विषयावरील प्रबंधासाठी मिळाला. तो ग्रंथ भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्था यांनी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने) प्रकाशित केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या परीक्षेतही ते सर्वप्रथम आले आहेत. त्या विद्यापीठाने त्यांना ‘वित्तीय आणि सामाजिक प्रशासन’ (इकॉनॉमिक अँड सोशल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन)या विषयासाठी पदव्युत्तर पदविका दिली. 
 डॉ. पद्माकर दुभाषी हे भारतातील केंद्रीय प्रशासकीय (आय.ए.एस.) स्पर्धा परीक्षेत उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. भारत सरकारने त्यांच्यावर सोपविलेल्या विविध जबाबदार्‍या त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
 पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी त्यांचा गौरव केला आहे.
 देशातील सहकार क्षेत्रातील एका मोठ्या खत- कारखान्याच्या उभारणीत त्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. ‘कृषक भारती’ या सहकारी संस्थेचे ते पहिले अध्यक्ष झाले. या संस्थेमार्फत शेतकर्‍यांना योग्य व दर्जेदार खतांचा पुरवठा व्हावा आणि शेती उत्पादन वाढावे या योजनेचा त्यांनी पाठपुरावा केला. ग्रामीण भारताचा त्यांचा डोळस अभ्यास आहे. अनेक घटकराज्यांमध्ये समूह विकास आणि सहकार प्रशिक्षण यांच्या संस्था भक्कम पायावर उभारण्यात त्यांचा मुख्य वाटा आहे. मसुरीच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट’चे ते संचालक होते. पुण्यात रिर्झव्ह बँकेने वित्तीय शेतकी महाविद्यालय सुरू केल्यावर त्याचे पहिले प्राचार्यपद त्यांनी भूषविले. त्या

२६६ शिल्पकार चरित्रकोश