पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिनईकर, सदाशिव शंभूराव प्रशासन खंड महत्त्वाची होती. तरुण आय.ए.एस. अधिकारी सदाशिव तिनईकर यांनी जनगणना निरीक्षक म्हणून आपली जबाबदारी उत्तम रितीने पार पाडली. मनमिळाऊ प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली. त्यानंतर तिनईकर यांनी प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईमध्ये विविध अधिकारपदे भूषविली. १९६३-६४ मध्ये तिनईकर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यात आदिवासी विकासाचा प्रश्न फारच ज्वलंत होता. आपल्या दोन वर्षांच्या कार्यकालातच तिनईकर यांनी आदिवासी विकासाबाबत महत्त्वपूर्ण धोरण राबविले. किंबहुना आदिवासी विकासाचा प्रश्न मार्गी लागण्याची सुरुवात ही तिनईकर यांनी त्या धोरणाची केलेली अंमलबजावणी होती असे म्हणणे अगदी योग्य ठरेल. नाशिक येथे हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक होण्याचा मानही तिनईकरांना मिळाला. केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेला हा उद्योग चालविण्याची जबाबदारी ह्या तरुण प्रशासकावर होती. शंकरराव चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना तिनईकर यांना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा, मुंबईपुरत्या मर्यादित असलेल्या शिवसेना या संघटनेची नुकतीच स्थापना झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या वेगळ्या राजकारणशैलीची सुरुवात झाली होती. शिवसेनाप्रमुखांशी म.न.पा. अध्यक्षांचे जेव्हा मतभेद अनेकदा झाले तेव्हा त्यातून तिनईकर यांनी मार्ग काढला. तसेच मुंबईच्या प्रश्नांच्या संदर्भात शिवसेनेला बरोबर घेऊन जाण्याची राजकीय प्रशासकीय कला त्यांनी आत्मसात केली असे म्हटले, तर ते अयोग्य ठरणार नाही. मुंबई महानगरातील महत्त्वाकांक्षी ‘मलनिस्सारण प्रकल्पा’ला त्यांच्या कारकिर्दीत सुरुवात झाली. पण तो पुढे काही कारणाने रखडला. विदेशी कंपनीची कोणतीही निविदा स्थायी समितीपुढे पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ पडून राहिली तर ती मंजूर करण्याचा अधिकार स्थायी समितीला न राहता, पालिका आयुक्तांच्या अधिकारात ती आपोआप मंजूर होते, हा राज्य सरकारने केलेला कायदा वापरणारे तिनईकर हे पहिले आयुक्त ठरले. महापौरांच्या निवडणुकीची आधीची पद्धत बदलून त्यांनी एका वेळी एकानेच मतदान करायची पद्धत आणली. या निर्णयामुळे त्यांना राज्यकर्त्यांशी बर्‍याच प्रमाणात संघर्ष करावा लागला. महापौर त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी महानगरपालिकेच्या खर्चाने जवळजवळ हजार लोकांना जेवण देत असत. ही पद्धत तिनईकरांनी बंद केली. महापौरांना पालिकेतर्फे दिले गेलेले वाहन त्या शहराच्या बाहेर घेऊन जाण्यास परवानगी नसते. पण बरेच महापौर ही प्रथा पाळत नाहीत. मुंबई महानगरपालिकेत तिनईकरांच्या पुढाकाराने याची कडक अंमलबजावणी सुरू झाली. पालिकेच्या विविध समित्यांच्या बैठका मुंबईबाहेर रम्य ठिकाणी आपआपल्या कुटुंबासह व्हायच्या. ही प्रथाही त्यांनी बंद पाडली. सार्वजनिक संस्थांना देणग्या देण्यासंबंधी निश्चित नियम आहेत. पण ते नियम मोडून ठराविक पक्षांच्या सदस्यांना मदत देण्यात येऊ लागली. तेव्हा ही देणग्या २६४ शिल्पकार चरित्रकोश