पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

NFIE| प्रशासन खंड तिनईकर, सदाशिव शंभूराव असताना त्यांनी समांतर सिनेमाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. प्रायोगिक किंवा समांतर सिनेमा त्यांच्या काळात रुजला व फोफावला. मालती तांबे-वैद्य यांना चित्रपटविषयक व्यासंग दांडगा असल्यामुळे एनएफडीसीमधील त्यांच्या कामाचे सर्व स्तरातून नेहमीच कौतुक होत असे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या काळात आणि त्या नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या राज्याच्या वाटचालीला विकासाची दिशा दाखविण्यात ज्या धुरिणांनी मोलाची कामगिरी बजावली त्यात मालती तांबे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. प्रागतिक विचार, आधुनिक राहणी, मृदु भाषा, शांत स्वभाव, प्रशासनावर पकड, आत्मविश्‍वास, मेहनती वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्या उत्तम बॅडमिंटनपटू होत्या व बॅडमिंटनच्या अनेक स्पर्धांत त्यांनी भाग घेतला होता. क्रीडांगणावर हे कर्तृत्व बजावताना शैक्षणिक आघाडीवरही त्यांनी अव्वल स्थान राखले होते. प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतरही क्रीडांगणावरही त्यांची कारकीर्द सुरूच होती. १९६८ मध्ये बॅडमिंटनच्या राष्टीय स्पर्धेत त्यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले होते. प्रशासकीय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत असताना त्या घरची आघाडीही उत्तम सांभाळत होत्या. नेत्रतज्ज्ञ असलेले त्यांचे पती डॉ. वसंत वैद्य, एक मुलगा आणि एक मुलगी अशा चौकोनी कुटुंबाचे तहहयात गृहसचिवपद त्यांनी तितक्याच समर्थपणे सांभाळले. वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. -नितीन केळकर तिनईकर, सदाशिव शंभूराव अतिरिक्त मुख्य सचिव - महाराष्ट्र राज्य आयुक्त - बृहन्मुंबई महानगरपालिका ३ एप्रिल १९३२ - २२ मे २०१० सदाशिव शंभूराव तिनईकर हे भारतीय प्रशासन क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव. त्यांचा जन्म बेळगावनजीक असलेल्या खानापूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण खानापूर येथेच झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी ते मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा वरच्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबई येथील विल्सन महाविद्यालयात दाखल झाले. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांनी तत्त्वज्ञान हा विषय निवडला. १९५२ मध्ये बी.ए. आणि १९५४ मध्ये एम.ए. ह्या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. मॅट्रिकपासून उच्च श्रेणी मिळविलेले हुशार विद्यार्थी तेव्हा प्राय: भारतीय प्रशासन सेवेत जाण्यासाठी होणार्‍या स्पर्धा परीक्षेची संधी घेत. सदाशिव तिनईकरांनीही ती संधी घेतली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तिनईकर अखिल भारतात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९५६ च्या निवड तुकडीतील आय.ए.एस. अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यांची पहिली नेमणूक सुरत येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. लवकरच म्हणजे, १९५७ मध्ये मधुमती बोरकर उर्फ मायावती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर फाउण्डेशनची शिष्यवृत्ती मिळवून ते जपान, युरोप व अमेरिकेला जाऊन आले. १९६०मध्ये झालेल्या जनगणना उपक्रमात ते महाराष्ट्राचे जनगणना निरीक्षक होते. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होत असताना झालेली जनगणना विशेष शिल्पकार चरित्रकोश