पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डिसूझा, जोसेफ बेन प्रशासन खंड डिसूझा, जोसेफ बेन मुख्याधिकारी, स्वस्त गृहनिर्माण योजना आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका ३ जून १९२१ - सप्टेंबर २००७ जोसेफ बेन डिसूझा यांचा जन्म एका कॅथलिक कुटुंबात झाला. वडील जॉन आणि आई लिडवाइन यांच्या संस्कारांच्या छायेत ते वाढले. जन्माच्या वेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे वातावरण असल्यामुळे देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. दोन भाऊ व एक बहीण असा त्यांचा परिवार होता. डिसूझा यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील सेंट झेविअर्स हायस्कूलमध्ये झाले. १९४४ साली त्यांनी सेंट झेविअर्स महाविद्यालयामधून गणित या विषयात पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले. पुढे १९५५ साली ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तेथील सिरॅक्यूझ विद्यापीठामधून लोकसेवा व्यवस्थापन या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण संपादन केले. तसेच १९५६मध्ये पुन्हा हार्वर्ड विद्यापीठ, केंब्रिज येथून लोकसेवा व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. डिसूझा यांनी देशसेवा करण्याच्या प्रेरणेतून १९४४मध्ये भारतीय नौसेनेत प्रवेश घेतला; पण त्यांना भारतीय प्रशासनात काम करण्याची विशेष इच्छा झाल्यामुळे पुढे त्यांनी भारतीय नौसेना सोडून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७मध्ये ते प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी फाळणीच्या वेळी पंजाबमध्ये निर्वासितांसाठी मदतकार्य केले. डिसूझा यांच्या कार्याचे भौगोलिक कार्यक्षेत्र बिहार, महाराष्ट्र, नवी दिल्ली इ. ठिकाणी होते. त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर पूर्व पाकिस्तानातील निर्वासितांच्या पुनर्वसनाचेदेखील काम संचालकपदी राहून केले. १९५०मध्ये ते अलिबाग येथे जिल्हाधिकारी होते. त्यानंतर १९६४मध्ये औरंगाबाद येथे ते आयुक्त पदावर कार्यरत होते. स.गो.बर्वे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव डिसूझांसाठी संस्मरणीय ठरला. बर्वे यांची न्याय्य वर्तणूक, सचोटी व कार्याला वाहून घेण्याची वृत्ती यांमुळे ते भारावून गेले. १९६६ ते १९६९मध्ये त्यांनी बी.ई.एस.टी.चे महाव्यवस्थापक म्हणून काम पाहिले. १९६९मध्ये ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते. १९७० ते १९७४ या काळात त्यांनी नवी मुंबई प्रकल्पात सिडकोचे व्यवस्थापन निदेशक म्हणून काम पाहिले. तसेच नवी दिल्ली येथील हुडको प्रकल्पातदेखील ते व्यवस्थापन निदेशक पदावर कार्यरत होते. त्यांनी प्रशासनातील अनेक जबाबदार्‍या अत्यंत चोखपणे निभावल्या. त्यांच्यातील कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणा या गुणवैशिष्ट्यांसाठी ते प्रसिद्ध होते. दिल्ली, आग्रा व भोपाळ येथील स्वस्त गृहनिर्माण योजना राबविण्यात डिसूझा यांचा महत्त्वाचा वाटा होता. १९७९ मध्ये डिसूझा हे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या सेवाकाळात त्यांना अमेरिकेत २६० शिल्पकार चरित्रकोश