पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ihen प्रशासन खंड डिसूझा, जोसेफ बेन सिरॅक्यूझ विद्यापीठाकडून ‘आदर्श माजी विद्यार्थी पुरस्कार’ मिळाला होता. डिसूझा हे कॅथलिक पंथाचे होते; पण त्यांची कोणत्याही धर्माशी वैचारिक बांधीलकी नव्हती. त्यांच्या ह्या वैशिष्ट्यासाठी १९९४ मध्ये त्यांना राजीव गांधी निधर्मवाद पुरस्काराने गौरविले गेले. निवृत्तीनंतर १९८१ ते २००१ मध्ये ते महाराष्ट्र शासनाच्या मुंबई विकास प्रकल्पांच्या परीक्षण समितीचे सदस्य होते. १९७९ ते १९८२ या काळात डिसूझा हे हैदराबाद येथील ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेशन स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया’ येथे प्राचार्य होते. तसेच १९८२ ते १९८५ या काळात त्यांनी वर्ल्ड बँकेत नागरी व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर ते पुन्हा भारतात परतले. १९९२ मध्ये मुंबईतील जसलोक रुग्णालय येथे ते मुख्य अधिकारी पदावर होते. २००२ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे ‘नो ट्रंपेट्स नॉर ब्यूगल्स : रेक्लेशन्स ऑफ अ‍ॅन अनरिपेन्टट बाबू’ हे आत्मचरित्र त्यांच्या विविधांगी कर्तृत्वावर प्रकाश टाकते. त्याचाच एस.ए. वीरकर यांनी ‘ना जलसा ना जल्लोष’ या नावाने मराठी अनुवाद केला आहे. १९९७ ते २००७ या काळात ते मुंबई येथील ‘नागरी निवारा’ या स्वस्त गृहनिर्माण योजनेत मुख्याधिकारी होते. आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत होते. - अनघा फासे


ई । शिल्पकार चरित्रकोश २६१