पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टाकळकर, वसंत देगुजी प्रशासन खंड ट सलग समतल चर तंत्राचा सुपरिणाम म्हणजे, पाण्याचा थेंब अन् थेंब त्याच क्षेत्रात अडवला गेला. दोन चरांच्या अंतरामध्ये पडणारा पाऊस चरांतच अडून राहू लागला. यामुळे जमिनीची धूप थांबून जास्तीचे पाणी जमिनीत पाझरून खाली जाऊन तलाव, विहिरींमध्ये साठू लागले. आपले काम शेतकर्‍यांच्या उपयोगी पडावे, त्यातून त्यांचे कष्ट हलके व्हावेत, अशी टाकळकरांची तळमळ होती. वनविभागातील त्यांची कारकीर्द नाशिकपासून सुरू झाली. चंद्रपूरच्या जंगलातही त्यांनी काही काळ काम केले. कुठेही असोत, प्रयोगशील टाकळकर आपल्या कल्पकतेचा, बांधीलकीचा, सचोटीचा, कर्तव्यदक्षतेचा प्रत्यय देत राहिले. १९९२ मध्ये राज्यसरकारने ग्रामस्थांच्या सहभागातून वनविकासाच्या संकल्पनेचा कार्यक्रम पुढे आणला, त्या वेळी टाकळकर हे सोलापूर जिल्ह्यात उप वनसंरक्षक होते. सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात त्यांनी सलग समतलचरांच्या कामाला सुरुवात केली. बहरून फुललेली रोेपे पाहून कर्मचार्‍यांची उदासीनता पळून गेली. त्यानंतर टाकळकरांची अहमदनगर जिल्ह्यात बदली झाली तिथेही ही मोहीम धडाक्याने सुरू झाली. १९९३ ते १९९६ या काळात सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चरांची कामे करण्यात आली. सुमारे २५,००० कि.मी. लांबीचे चर खोदले गेले. कर्जत तालुक्यात आधीच्या वर्षी जनावरांना पिण्यासाठीसुद्धा पाणी नव्हते. तिथे सलग समतल चरांचे काम झाल्यानंतर लगेचच्या वर्षी विहिरीतल्या पाण्याची पातळी वाढली. शेतकरी बागायती भुईमूग घेऊ लागले. टाकळकरांना गावकरी सांगत, गावात पाणी नाही, कितीही खोल खणले तरी पाणी लागत नाही, तेव्हा टाकळकर त्यांना डोंगराकडे बोट दाखवून म्हणत, “तुमचे पाणी तिथे आहे!” या उक्तीचा प्रत्यय शेतकर्‍यांना येत होता. २००४ पर्यंत टाकळकरांच्या पुढाकार आणि मार्गदर्शनातून धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्येही अनेक भागांत सलग समतल चरांची कामे उभी राहिली. त्याआधी २००३ पर्यंत नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्येही अनेक भागांत सलग समतल चरांच्या साहाय्याने एकशे तीस दशलक्ष घन मीटर एवढे पाणी अडविण्यात वनविभागाला यश आले. हे पाणी बावीस हजार हेक्टर पडीक जमिनीत जिरवल्यावर तिथल्या पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता कमी झाली. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या म्हसवंडी गावात तर हा प्रयोग खूप यशस्वी ठरला. इथल्या मंदिराजवळ बांधलेल्या रस्त्याला लोकांनी टाकळकरांचेच नाव २५८ शिल्पकार चरित्रकोश