पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड़ जोशी, वसंत कृष्ण काम केले. विज्ञानाच्या साहाय्याने गुन्ह्याचा तपास कसा करावा या तंत्राचा तेथे त्यांनी अभ्यास केला. भारतातील सर्व भागांतून तेथे प्रशिक्षणासाठी अधिकारी येत. त्यांच्यासह चर्चा, विचारविनिमय, संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या गुन्हेगारी घटना, त्यांचे तपासकामातील अनुभव, हा सर्व मौल्यवान खजिना त्यांच्या हाती आला. अगदी लहानपणापासून त्यांच्यावर झालेले संस्कार, घरातील वातावरण, त्यांचे पोलीस खात्यातील अनुभव, या सर्व शिदोरीचा त्यांनी आपल्या लेखनात मोठ्या कौशल्याने उपयोग केला. त्यांचे लेखन केवळ पोलीस तपासकथा न राहता त्या अध्यात्म, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान यांनी परिपूर्ण असत. व.कृ. जोशींच्या ‘इन्स्पेक्टर प्रधान’ या व्यक्तिरेखेने वाचकांना भुरळ घातली होती. त्यांच्या लेखनकालाच्या सुमारास पोलीस तपास कथा लिहिणारे अनेक लेखक होते. ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केस माहीत करून घेत व त्यावर काल्पनिक साज चढवत. घटनांची जंत्रीच वाचकांसमोर मांडत. पण व.कृ. जोशींच्या लेखनाचे वैशिष्ट्य हे, की ते अशा लेखनाच्यापलीकडे जाऊन, गुन्हेगार आणि त्यांचे निकटवर्तीय यांचे मनोव्यापार लक्षात घेऊन घटनेच्या मुळापर्यंत पोहोचत. घडलेल्या घटनेकडे फक्त पुरावा शोधण्यासाठी न पाहता गुन्हेगाराच्या सर्व शक्यता पडताळून पाहत अन् संशयित गुन्हेगाराच्या जाबजबाबातून तोच खरा गुन्हेगार आहे का आणि कोणी, हे शोधून काढत. त्यांच्या तपासकामाचे जसे वैशिष्ट्य होते, तसेच लेखनाचेही वैशिष्ट्य होते. जे. कृष्णमूर्तींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळेच पोलीस तपास करताना सापडलेले सत्य समाजासमोर यायला हवे, असे त्यांना वाटे. या अंत:प्रेरणेतूनच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. पोलीस अधिकारी असूनही, सतत गुन्हे अन् गुन्हेगारांशी संबंध येत असूनही त्या व्यवसायामुळे येणारी आढ्यता, तुच्छता व मग्रूरी यांपासून ते कोसो दूर होते. प्रत्येक व्यक्तीशी सहृदयतेने, संवेदनशीलतेने अन् हळुवारपणे बोलून त्यांची मने जिंकण्याचे कसब त्यांच्यापाशी होते. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पाहावयास मिळते. व.कृ. जोशींनी सत्यघटनांवर, शास्त्रीय तपासकामाच्या तंत्रावर आणि आपल्या प्रत्यक्ष जीवनातल्या अनुभवांवर अनेक कथा लिहिल्या. त्यांचे ३३ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘गुन्हाकबूल’, ‘पाठलाग’, ‘सतीचं वाण’, ‘विज्ञान पोलीसकथा’ हे त्यांपैकी काही. महाराष्ट्रात आणि अन्य राज्यांत त्यांची अनेक व्याख्याने व कथाकथने झाली आहेत. त्यांच्या कथांच्या ध्वनिफिती आणि कथांवर आधारित दूरदर्शन मालिका प्रदर्शित झाल्या. ‘हॅलो, मी इन्स्पेक्टर प्रधान बोलतोय’ या कथासंग्रहावरची दूरदर्शन मालिकाही गाजली. विज्ञानावर आधारित शास्त्रीय तपासकामांवरील त्यांचे अभ्यासक्रम पुस्तक प्रकाशित झाले आहे आणि महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या शिक्षणक्रमात त्याचा समावेश झाला आहे. खरे म्हणजे त्यांनी लिहिलेली प्रत्येक कथा, लेख भारतातील सर्व पोलीस खात्यांनी आणि गुन्हेगारी विश्वाला मार्गावर आणू इच्छिणार्‍या सर्व सरकारी खात्यांनी ‘संदर्भ’ म्हणून वापरायला हवी. कारण व.कृं.नी ते निश्चित विचारांनी, ध्येयाने लिहिले आहे. म्हणूनच व.कृ. जोशी हे नाव प्रत्येक मराठी साहित्यप्रेमी रसिकाच्या मनात कायम राहील. वकृंना प्राप्त झालेले महत्त्वाचे पुरस्कार: १९७४ मध्ये राष्ट्रपती पोलीस सेवा पदक (अतुलनीय स्तुत्य सेवेसाठी), ‘गुन्ह्याचा तपास आणि विज्ञान’ या पुस्तकाकरिता त्यांना महाराष्ट्र राज्य विज्ञान पुरस्कार मिळाला. निवृत्तीनंतरही त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी केली महत्त्वाची कामे पोलीस सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांनी शिल्पकार चरित्रकोश