पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जोसेफ, डॅनिअल ट्रेव्हेलिन प्रशासन खंड नेमलेल्या समितीचे ते सदस्य होते, तसेच पोलीस कोठडीत होणार्‍या कैद्यांच्या मृत्यूची चौकशी करणार्‍या समितीचेही ते सदस्य होते. पोलीस सेवेत असताना त्यांनी जनसंपर्क अधिकारी, ‘दक्षता’ मासिकाचे संस्थापक, संपादक, महासंचालक तसेच अतिरिक्त पोलीस व ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विश्वस्त म्हणूनही काम केले. मातब्बर वृत्तपत्रांनी आणि नियतकालिकांनी त्यांच्या साहित्याला कायमच प्रसिद्धी दिली. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत होता. त्याच वेळी महाराष्ट्र राज्य सरकारने जनता आणि पोलीस यांच्यामध्ये सहकाराचा दुवा निर्माण व्हावा यासाठी एका मासिकाची निर्मिती करण्याची योजना आखली. त्यासाठी जनसंपर्क अधिकारी आणि संपादक म्हणून व.कृं.जोशीची निवड करण्यात आली. ‘दक्षता’ मासिकाची सुरुवात करताना व.कृं.ना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या मासिकासाठी सरकारने निधी ंमंजूर केला नव्हता. तेव्हा पोलीस कल्याण निधीतून त्यांनी ३०,०००/- रुपयांचे कर्ज घेतले. मासिक सुरू झाले. छपाई, सजावट, व.कृं.चे स्वत:चे व त्यांनी निवडलेले उत्तम साहित्य, त्यांचे व्यवस्थापकीय कौशल्य, जाहिरात व विक्रीसाठी आवश्यक असलेला जनसंपर्क, सौजन्य यांमुळे ‘दक्षता’ अल्पावधीतच वाचकप्रिय झाले. त्यांनी घेतलेले कर्ज एका वर्षातच परत फेडले. मराठी मासिकाच्या इतिहासात हे नोंद करण्यासारखेच आहे. प्रामाणिक आणि कायद्याच्या मार्गाने जाणार्‍या पोलीस अधिकार्‍याला जे जे सहन करावे लागते त्याला ते सामोरे गेलेच, परंतु या सर्वांपेक्षा त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात, डोके सुन्न करणारा होता. व.कृं.चा मुलगा सुहास, वय वर्षे पंचवीस भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर होता. १९७० मध्ये सुहासचे अपघाती निधन झाले. यातून त्यांनी स्वत:ला सावरले आणि आपला वेळ लेखनात व सामाजिक कार्यात गुंतवला. मुलाच्या निधनानंतर त्यांना सरकारतर्फे जमीन व अन्य सुविधा मिळत होत्या पण त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. २० सप्टेंबर २००४ रोजी व.कृं.जोशींचे निधन झाले आणि इन्स्पेक्क्टर प्रधानांच्या रूपाने, कायम अन्यायाविरुद्ध लढणारी लेखणी शांत झाली. - राजेंद्र कुलकर्णी

जोसेफ, डॅनिअल ट्रेव्हेलिन भारतीयप्रशासकीयसेवा, सचिव - आरोग्य, नगरविकास विभाग २१ डिसेंबर १९४५ जोसेफ डॅनिअल ट्रेव्हेलिन यांचा जन्म तामिळनाडू मधील तुतिकोरीन या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पॉल सॅम्युएल जोसेफ होते. मदुराईमध्ये लहानपण गेल्यानंतर मद्रास विद्यापीठातून १९६६ मध्ये इंग्रजी या विषयात एम.ए.ची पदवी मिळविली. पुढे ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठातून १९८५ मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात एम.ए. केले. शालेय, पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणातही ते कायमच प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. दोन वर्षे मदुराई येथील एस.व्ही.एन. महाविद्यालयात व्याख्यात्याची नोकरी केल्यानंतर १९६७-६८ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. उत्तीर्ण झाल्यानंतर जोसेफ यांना महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्त करण्यात आले. एक वर्ष मसुरी येथे प्रशिक्षण घेतल्यावर ते सातारा येथे पुढील प्रशिक्षणासाठी रुजू झाले व नंतर त्यांची नियुक्ती सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. १९७२ मध्ये जोसेफ यांचा विवाह सिलका यांच्याशी झाला. १९७३ मध्ये त्यांची बदली अतिरिक्त जिल्हाधिकारी २५४ शिल्पकार चरित्रकोश