पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जोशी, वसंत कृष्ण । प्रशासन खंड त्यांनी घेतले नाही. यशदाच्या ‘यशोमंथन’ या त्रैमासिकातून शासनाच्या विविध निर्णयांची माहिती देणारे सदर ते चालवतात. त्यांनी विभागीय चौकशी या विषयाची सर्वंकष व अद्ययावत माहिती देणारे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्याचा पत्ता http://departmentalenquirymarathi.blogspot.com असा आहे. जोशी यांनी आपल्या कारकिर्दीत एखादे पद मिळावे म्हणून कधीच अट्टहास अथवा प्रयत्न केला नाही. कोठलेही पद कमी महत्त्वाचे नसते, जे पद मिळेल त्या पदावर प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केल्यास महत्त्वपूर्ण योगदान देता येते यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच त्यांनी जेथे-जेथे काम केले, मग ते पद मंत्रालयातील असो वा क्षेत्रीय पातळीवर असो, तेथे-तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. श्रीधर जोशी हे अभ्यासू, प्रामाणिक, नि:स्पृह, निगर्वी, मेहनती, सुसंस्कृत, सोज्ज्वळ, कर्तव्यदक्ष व सहकार्‍यांना बरोबर घेऊन जाणारे लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच वरिष्ठांना त्यांच्याविषयी प्रेम व कनिष्ठांना आदर वाटत असे. शासनयंत्रणेतील दोष काढून टाकायचे असतील तर त्याची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे, असे ते मानतात. नोकरीच्या निमित्ताने कराव्या लागणार्‍या दौर्‍यांत आपल्यासाठी कनिष्ठ कर्मचार्‍यांना आथिर्र्क तोशीस लागू नये याची ते काळजी घेत. सेवेच्या सुरुवातीच्या काळात तर दौर्‍याच्या वेळी ते स्वत:चा जेवणाचा डबा घेऊन जात असत. स्वत:च्या कामासाठी त्यांनी सरकारी वाहन कधी वापरले नाही. त्यांची सुविद्य पत्नी भक्ती हिच्या पाठिंब्यामुळेच प्रशासन क्षेत्रातील चढउतार, ताणतणाव यांना धीराने सामोरे जाऊन त्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली, त्यांच्या दोन्ही कन्यांपैकी मोठी योगिता आपटे हिने बी.एस्सी. व एम.एस्सी. करून काही काळ नोकरी केली. धाकटी मुलगी कीर्ती ही एम.ए. व एम.बी.ए. असून प्रख्यात आयटी कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नोकरी करत आहे. - बबन जोगदंड

जोशी, वसंत कृष्ण भारतीयपोलीससेवा संस्थापकसंपादक-‘दक्षता’मासिक लोकप्रियपोलीसतपासकथाकार १५ फेब्रुवारी १९१८ - २० डिसेंबर २००४ वसंत कृष्ण तथा व.कृ. जोशींचा जन्म अलिबागमध्ये झाला. त्या काळात, इंग्रजांच्या जमान्यात त्यांच्या वडिलांनी उपजिल्हाधिकारी हे पद भूषवले. व.कृं.ना तीन भाऊ आणि तीन बहिणी. व.कृ. अगदी लहान असताना त्यांच्या आईचे छत्र हरपले. मोठ्या भावाच्या पत्नीने त्यांना मातेचे प्रेम दिले. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे ते विद्यार्थी. त्यांनी वक्तृत्वस्पर्धा, राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा जिंकल्या. उंचेपुरे, गोरेपान, बळकट शरीरयष्टी, धारदार नाक या त्यांच्या प्रसन्न आणि सतत हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे ते सर्वांना आवडायचे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे वर्गमित्र त्यांना ‘युरोपियन’ म्हणायचे. पुढे मुंबई विश्वविद्यालयातून रसायनशास्त्र विषयात त्यांनी बी.एस्सी.ची पदवी संपादन करून पोलीस सेवेत प्रवेश केला. सेवेत असतानाच त्यांनी कायद्याची पदवी घेतली. तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता आणि पोलीस सेवा म्हणजे तारेवरची कसरतच होती. त्या वेळी मुंबई राज्यात गुजरात आणि कर्नाटक यांचाही समावेश होता. त्यांना या तिन्ही भाषाभागांत काम करण्याचा अनुभव मिळाला. केंद्रीय डिक्टेटर ट्रेनिंग स्कूल, कोलकाता येथे त्यांनी अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून २५२ शिल्पकार चरित्रकोश