पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

च चौबळ, विनायक वासुदेव प्रशासन खंड (मेघालय) अशा विविध ठिकाणी ते या काळात काम करत होते. नागालँड, मणिपूर, आसाम, मेघालय व मिझोराम या क्षेत्रात काम करत असताना ते गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. १९७४ मध्ये चौबळ यांची बदली महाराष्ट्र शासनाकडे झाली. त्यानंतर औरंगाबाद विभागाच्या उपमहानिरीक्षक पदावर त्यांची नेमणूक झाली. महाराष्ट्र राज्य गुप्त विभागाचे व गुन्हा अन्वेषण विभागाचे उपमहानिरीक्षक, पुण्याचे व बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त, लाचलुचपत विरोधी विभागाचे संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषवली. १९७८ मध्ये महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महानिरीक्षक (इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस) या सर्वोच्च पदावर त्यांची नेमणूक झाली. ३१ऑक्टोबर१९७९ रोजी ते या पदावरून निवृत्त झाले. सेवा काळातील उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच कठीण प्रदेशातील उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस पदक, राष्ट्रपतींचे सुवर्णपदक आणि इतर सात पदकांचेही ते मानकरी आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी चौबळ यांच्या शासकीय ज्ञानाचा व उत्कृष्ट सेवेचा गौरव म्हणून १९८२ ते १९८४ या काळात त्यांची मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उप कुलगुरू (व्हाईस चॅन्सेलर) म्हणून नेमणूक केली. चौबळ यांची दोन्ही मुले उच्चविद्याविभूषित असून थोरला मुलगा मिलिंद अमेरिकेत वास्तव्यास आहे. तर, धाकटा राजीव याचा अभियांत्रिकीचा व्यवसाय औरंगाबाद येथे आहे. निवृत्तीनंतर चौबळांचे वास्तव्य औरंगाबाद येथे आहे. - वर्षा जोशी-आठवले संदर्भ : १. मोकाशी, प्र. ल.; ‘चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचा इतिहास’.

शिल्पकार चरित्रकोश