पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड जाधव, यशवंत गणेश जाधव, यशवंत गणेश भारतीय वनसेवा, केंद्रीय वन महानिरीक्षक १० एप्रिल १९३० यशवंत गणेश जाधव यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुंदराबाई असे होते. त्यांचे वडील वकील होते. त्यांनी अमरावती येथे काही वर्षे दिवाणी न्यायाधीश (सिव्हिल जज्ज) म्हणून काम केले. यशवंत जाधव यांनी १९४९ मध्ये नागपूर विद्यापीठामधून बी.एस्सी.ची पदवी प्राप्त केली. त्या वेळी ते विद्यापीठात पहिले आले. १९५० मध्ये ‘सुपिरिअर फॉरेस्ट सर्व्हिस’ या मध्यप्रदेश सरकारच्या वनसेवेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. डेहराडून येथील प्रशिक्षणानंतर जाधव यांची प्रथम नियुक्ती अमरावती येथे साहाय्यक वनसंरक्षक (असिस्टंट कॉन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट) या पदावर करण्यात आली. मध्यप्रदेशातील होशंगाबाद, हर्दा, नेपानगर या ठिकाणी त्यांच्या बदल्या झाल्या. नेपानगर या ठिकाणी उत्तम प्रतीचा कागद निर्माण करणारा कारखाना आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर सलाई या लाकडाची तोड केली जाते. या सलाईच्या जंगलाची पुन: लागवड आणि नियोजन करण्यासाठी जाधव यांनी या ठिकाणी सलाईच्या झाडाचे लागवड तंत्र विकसित केले. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला गेलाच, त्याबरोबरच कागदनिर्मितीसाठी सलाईचे लाकूडही उपलब्ध होऊ लागले. १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेनंतर यशवंत जाधव यांची नियुक्ती द्वैभाषिक मुंबई राज्यात अमरावती विभागातील अल्लापल्ली येथे करण्यात आली. त्यानंतर त्यांना बढती मिळून त्यांच्यावर नागपूरमधील वर्धा विभाग येथे त्यांची वनसंरक्षक या पदावर नेमणूक करण्यात आली. या पदावर ते तीन वर्षे कार्यरत होते. या वेळी त्यांनी सलाईचे जंगल आणि मुख्य रस्ता यांच्या दरम्यान कच्च्या रस्त्यांचे बांधकाम केले. त्यामुळे त्या हंगामात संत्र्यांच्या पेट्या तयार करण्यासाठी लागणारे सलाईचे लाकूड बाजारात योग्य वेळी पोहोचू शकले. हे कच्चे रस्ते बांधण्यासाठी जाधव यांनी सात लाख रुपये खर्च केले. त्याकाळात ती रक्कम खूपच मोठी होती. परंतु जाधव यांनी धोका पत्करून हे काम पूर्ण केले. याचे फलित म्हणून वनविभागाच्या इतिहासात प्रथमच नागपूर विभागाला बावीस लाख रूपये नफा झाला. त्या वर्षी वनातून नफा मिळवून देणार्‍या राज्यातील सर्व विभागांत वीस ते बावीसाव्या क्रमांकावर असणारा नागपूर विभाग तिसर्‍या क्रमांकावर आला होता. त्यानंतर सहा वर्षांच्या काळासाठी जाधव यांची नियुक्ती पुणे येथे वनाधिकारी या पदावर करण्यात आली. या वेळी वनविभागातील नावाजलेले मुख्य वनसंरक्षक सदाशिव बूट यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या वेळी जाधव यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह पुढील दहा-पंधरा वर्षांतील महाराष्ट्राचे वनस्पती नियोजन करणारा आराखडा तयार केला. या आराखड्याचे संपूर्ण देशभर शिल्पकार चरित्रकोश २४३