पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड चौबळ, विनायक वासुदेव बालगंधर्व यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. चिन्मुळगुंद नगरविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव होते. १९६८ मध्ये गृहसचिव या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली. संस्कृत भाषेचा व्यासंग असल्यामुळे अनेक विद्वान व्यक्तींशी त्यांचा स्नेह होता. निवृत्तीनंतर चिन्मुळगुंद यांनी वैदिक अध्ययन आणि सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या भारतीय चरित्रकोश मंडळाच्या कामाला वाहून घेतले. भारतीय चरित्रकोश मंडळाचे ते अध्यक्ष होते. समाजातील उत्तम गुणांची पारख करणे आणि स्वत:चे मोठेपण विसरून समाजातील विद्वज्जनांचा आदर करणे ही त्यांच्या व्यक्तित्वाची वैशिष्ट्ये होती. फलटण येथील सत्पुरुष गोविंद महाराज उपळेकर यांना ते गुरुस्थानी मानत. भारतीय नाणकशास्त्र विभागाचे ते अध्यक्ष होते. चिन्मुळगुंद यांचा स्वत:चादेखील प्राचीन नाण्यांचा मोठा संग्रह होता. अवकाश निरीक्षण हादेखील त्यांचा छंद होता. त्यांनी स्वत: महाविद्यालयात शिकत असताना आकाशनिरीक्षणासाठीची दुर्बीण तयार केली होती. प्रशासकीय सेवेतील त्यांच्या महत्त्वपूर्ण कामामुळे भारतीय चरित्रकोश मंडळाच्या ट्रस्टकडून चिन्मुळगुंद यांच्या नावाने प्रशासनात शाश्वत, नावीन्यपूर्ण आणि झोकून देऊन काम करणार्‍या अधिकार्‍यांसाठी १९८६ पासून पुरस्कार देण्यास सुरुवात केली गेली. सरकारकडून या पुरस्काराला मान्यता देण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष असत. प्राचीन भारतीय प्रशासक चाणक्य यांची मूर्ती आणि “न्याययुक्तं प्रशासकम् मातरं मन्यंते प्रज:” हे चाणक्यनीतीतील सुभाषित कोरलेले सोन्याचे नाणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वैदिक संस्कृती आणि संस्कृत या विषयावरच्या काही अभ्यासपूर्ण पुस्तकांचे लेखन चिन्मुळगुंद यांनी केले आहे. या पुस्तकांचे प्रकाशन भारतीय चरित्रकोश मंडळाकडून करण्यात आले. अशा या विद्वान आणि कार्यकुशल प्रशासकीय अधिकार्‍याचा मृत्यू लंडन येथे झाला. - संध्या लिमये

चौबळ, विनायक वासुदेव महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महानिरीक्षक ११ ऑगस्ट १९२१ - विनायक वासुदेव चौबळ यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीतील पहिले पदवीधारक होते. बी.टी. (बॅचलर ऑफ टीचिंग) ही पदवी त्यांनी घेतली होती. तसेच एम.एड.(मास्टर ऑफ एज्युकेशन) ही पदवीही त्यांनी मिळवली होती. मुंबईच्या तत्कालीन शिक्षण विभागात कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे ते शिक्षणाधिकारी होते. विनायक चौबळ यांचे शिक्षण नाशिक, एलफिन्स्टन विद्यालयात व विल्सन महाविद्यालयात झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी महाविद्यालयातच अध्यापनाचे काम केले. नंतर मुंबई सचिवालयात ते नोकरी करू लागले. १९४८ मध्ये त्यांनी भारतीय पोलीस खात्यात प्रवेश केला. नाशिक, खेडा व धारवाड जिल्ह्यांत त्यांनी साहाय्यक पोलीस आयुक्त पदावर काम केले. नंतर पोलीस सुपरिंटेंडट म्हणून कारवार, ठाणे, सोलापूर, सातारा व अहमदाबाद येथेही त्यांनी काम केले. दरम्यान न्यायाधीश अनंतराव फडकर यांच्या कन्या पद्मजा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९५७ ते १९७२ या काळात भारत सरकारच्या गुप्तवार्ता विभागात ते काम करत होते. मुंबई, नागपूर, गोवा, दिल्ली, कोहिमा (नागालँड) व शिलाँग शिल्पकार चरित्रकोश २४१