पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड चिन्मुळगुंद, पांडुरंग जयराव स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने त्यांना ४८ लक्ष रुपयांच्या जलपुरस्काराने गौरविले आहे. हा पुरस्कार नोबेल पुरस्काराच्या समकक्ष मानला जातो. - वर्षा जोशी-आठवले

चिन्मुळगुंद, पांडुरंग जयराव गृहसचिव, महाराष्ट्र राज्य १२ ऑक्टोबर १९३१ - २९ एप्रिल १९८३ पांडुरंग जयराव चिन्मुळगुंद यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातील चिन्मुळगुंद हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांचे वडील मुंबई प्रांतामध्ये न्यायाधीश होते. त्यांच्या आईचे नाव सीताबाई होते. पांडुरंग चिन्मुळगुंद यांचे शिक्षण पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. फर्गसन महाविद्यालयामधून त्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन विषयांत बी.ए. पूर्ण केले. ते संस्कृत या विषयाचे गाढे अभ्यासक होते. त्यांचा ज्ञानेश्वरीचा विशेष अभ्यास होता. १९३८ मध्ये चिन्मुळगुंद आय.सी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि प्रशासकीय सेवेमध्ये मुंबई प्रांतात त्यांची नियुक्ती करण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील इतर संस्थानांप्रमाणेच सांगलीच्या पटवर्धनांच्या संस्थानाचेही स्वतंत्र भारतात विलीनीकरण करण्यात आले. सांगली संस्थानामधून दक्षिण सातारा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. (सध्याच्या सांगली जिल्ह्यास पूर्वी दक्षिण सातारा असे म्हणत असत.) १९४८ ते १९५० या कालावधीत या जिल्ह्याचे ते पहिले जिल्हाधिकारी होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा हा काळ संक्रमणाचा होता. विशेषत: संस्थानातील प्रजेला प्रशासकीय प्रक्रियेची माहिती करून देणे याची जबाबदारी चिन्मुळगुंद यांनी अतिशय चोखपणे पार पाडली. १९५० ते १९५४ या चार वर्षांच्या कालावधीत चिन्मुळगुंद सहकार निबंधक या पदावर कार्यरत होते. महाराष्ट्रात सहकार खात्याची नुकतीच सुरुवात करण्यात आली होती. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे-पाटील यांच्यासह चिन्मुळगुंद यांनी सहकार विभागाची रचना, कायदे, नियम तरतुदी यांच्या निर्मितीमध्ये मोठे योगदान दिले. आज महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सहकार क्षेत्र आघाडीवर आहे. हे चिन्मुळगुंद यांनी केलेल्या सहकारविषयक मूलभूत कामाचे फलित आहे. १९५४ नंतर ते शिक्षण खात्याचे सचिव होते. त्या वेळी सांस्कृतिक खातेदेखील शिक्षण खात्यामध्येच समाविष्ट होते. चिन्मुळगुंद शिक्षण सचिव म्हणून काम करत असताना शासनाने पुणे येथील राजा दिनकर केळकर संग्रहालय चालवण्यास घेतले. या कामाचा संपूर्ण आराखडा आणि नियोजन चिन्मुळगुंद यांनी केले होते. विद्वान वैदिक घनपाठी ब्राह्मणांना शासनाकडून पुरस्कार आणि मानपत्र देण्याची योजना त्यांनी सुरू केली. त्यांनी मोठ्या कलावंतांना वृद्धापकाळामध्ये निवृत्तिवेतन देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्या वेळी २४० शिल्पकार चरित्रकोश