पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| च | चितळे, माधव आत्माराम प्रशासन खंड करण्यासाठी भविष्याचा वेध घेता, राज्य सरकारची ‘पाणी’ या क्षेत्रातील तुमची सेवा फार उजवी ठरेल.” डॉ. चितळे यांना हा सल्ला भावला आणि त्यांनी ‘पाणी’ या क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कामाच्या स्वरूपात आपणां सर्वांना याची प्रचिती आलेली आहे. चाफेकर हे प्रखर राष्ट्रीय वृत्तीचे होते. परदेशी सल्ले आपण गरजेपुरते वापरावेत पण भारतवासीयांना जे अनुकूल आहे, स्थानिक वैशिष्ट्याशी जे साधर्म्य ठेवणारे व काटकसरीचे आहे, त्याचाच स्वीकार करावयास पाहिजे, या विचाराचा ते आयुष्यभर पाठपुरावा करत राहिले. वैतरणा धरणाच्या धर्तीवर कोयना धरणपण पूर्णपणे काँक्रीटचे बांधावे, असा परदेशी सल्लागारांचा आग्रह असतानाही चाफेकरांनी यात बदल करून सहा ते आठ घनफूट आकाराचे मोठे दगड, जवळजवळ एक तृतीयांश जागा व्यापणार्‍या काँक्रीटमध्ये मूरवून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम शैलीचा आविष्कार घडविला. या रबल काँक्रीटमुळे खर्चात काटकसर झाली आणि काँक्रीट अधिक घन झाले. मुंबई महानगरपालिकेस जागतिक बँकेने भातसा हे धरण काँक्रीटमध्ये करावे असा सल्ला दिला. या प्रकल्पावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने काम करणार्‍या डॉ. चितळे यांनी काँक्रीटऐवजी दगडी धरण करावे, या प्रकल्पात सिंचनाचाही अंतर्भाव करावा व धरणाच्या पायथ्याशी एक जलविद्युत केंद्र उभे करावे असा आग्रह धरला होता. जागतिक बँकेच्या सल्लागारांना हे पटत नव्हते. डॉ. चितळे यांनी भातसा प्रकल्प स्थळी चाफेकरांना आणले व स्वत:चा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. चाफेकरांनी डॉ. चितळे यांच्या आग्रही भूमिकेस पूर्ण पाठिंबा दिला. आजच्या भातसा प्रकल्पाचा उगम चाफेकर आणि चितळे यांच्या दूरदृष्टीत आहे. राज्यामध्ये सिंचनाचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून सह्याद्रीतून उगम पावणार्‍या नद्यांवर रांगेने ठरावीक अंतरावर बंधारे बांधावेत आणि नदीच्या दोन्ही बाजूंना साधारणत: २५ ते ३० मी. उंचीपर्यंतचे क्षेत्र उपसा सिंचन पद्धतीने सिंचनाखाली आणण्याचा पाठपुरावा ते करत राहिले. या दृष्टीने त्यांनी उपसा सिंचनावर आधारित सिंचनाचा बृहत् आराखडा तयार केला होता असे समजते. काळाच्या ओघात तो मागे पडला. त्यांचा एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९५३ मध्ये बी.ई. (मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल) झाले व त्यांनी खाजगी क्षेत्रात सेवा केली. - डॉ. दिनकर मोरे

चितळे, माधव आत्माराम अध्यक्ष केंद्रिय जल आयोग, महासचिव- आंतरराष्ट्रीय सिंचन व निस्सारण आयोग ८ ऑगस्ट १९३४ ऋ मुख्य नोंद - विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण खंड माधव आत्माराम चितळे यांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजे यवतमाळ येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण चाळीसगाव येथे झाले. पुणे विद्यापीठाच्या बी.ई. परीक्षेत ते पहिल्या वर्गात पहिले आले. १९५६मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. शासकीय नोकरीत असताना त्यांनी विविध ठिकाणी काम केले. १९६०मध्ये जागतिक बँकेने मंजूर केलेल्या एका योजनेनुसार मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या भातसा धरणाच्या कामाला सुरुवात झाली. मूळ योजनेत चितळे यांनी काही बदल सुचवले. या बदलांमुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याबरोबरच आसपासच्या भागाला जलसिंचनासाठी पाणी मिळाले, कालवा झाला, जलविद्युत केंद्रही तयार झाले.

२३८ शिल्पकार चरित्रकोश