पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग। गोळे, पद्माकर विश्वनाथ प्रशासन खंड डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर, डॉ.गोडबोले यांची त्या पदावरून गच्छन्ती व्हावी यासाठी तोच उद्योगसमूह वरिष्ठ पातळीवरून सक्रिय बनला. केंद्रीय नगरविकास खात्याच्या सचिव पदाचा कार्यभार १९९१ सालच्या एप्रिल महिन्यात स्वीकारलेल्या डॉ.गोडबोले यांची केंद्रीय गृहसचिव पदावर सरकारने ४ऑक्टोबर१९९१ रोजी नियुक्ती केली. राष्ट्रीय शहरी व गृहनिर्माण व अनिवासी भारती यांच्या गुंतवणुकीसंबंधातील धोरण आखण्यात त्यांचा सहभाग होता. बाबरी ढांचा पाडण्याचे प्रकरण डॉ.गोडबोले यांच्या गृहसचिवपदाच्या कार्यकालादरम्यानच घडले. बाबरी ढांचाचा विध्वंस आणि त्यानंतर देशाच्या विविध भागांत उसळलेल्या हिंसाचाराचे खापर गृहसचिवांच्या माथ्यावर फोडण्याची रीतसर मोहीमच जणू हाती घेण्यात आली. त्यासाठी माध्यमांतील काही घटकांनाही हाताशी धरले गेले. या सगळ्या अपप्रचाराला आणि ‘वड्याचे तेल वांग्यावर’ काढण्याच्या प्रवृत्तीला विटून, अखेर २३मार्च१९९३ रोजी डॉ.माधव गोडबोले यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा सादर केला व प्रशासकीय सेवेमधून रीतसर निवृत्त होण्यास सुमारे दीड वर्षाचा कालावधी असताना मुदतपूर्व स्वेच्छानिवृत्ती घेतली. याचबरोबर भारतीय लोकशाहीविषयक माधव गोडबोले यांनी विपुल लेखन केले आहे. ‘इंडियाज् पार्लमेंटरी डेमॉक्रसी ऑन ट्रायल’ तसेच भारतीय न्यायव्यवस्थेवर ‘ज्युडिशिअरी अ‍ॅण्ड गव्हर्नन्स इन इंडिया’ ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. ‘द होलोकास्ट ऑफ इंडियन पार्टिशन अ‍ॅण्ड इन्क्वेस्ट’ हे पुस्तक फाळणीबाबत असून पब्लिक अकाउंटॅबिलिटी अ‍ॅण्ड ट्रान्स्फरन्सी : द इम्परेटिव्हज् ऑफ गुड गव्हर्नन्स’ हे अभ्यासपूर्ण पुस्तकसुद्धा प्रसिद्ध आहे. - अभय टिळक गोळे, पद्माकर विश्‍वनाथ भारतीय रेल्वे सेवा ७ डिसेंबर सन १९२२

पद्माकर विश्‍वनाथ गोळे यांचा जन्म इंदौर येथे झाला. त्यांचे वडील हे इंदौरमधील होळकर महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. आई कमलाबाई घरी मुलांना स्वयंशिस्तीचे धडे देत असेत. त्यांचे आजोबा गोपाळ शिवराम गोळे हे इंदौर संस्थानात जिल्हा न्यायाधीश होते तर आजोबांचे बंधू महादेव शिवराम गोळे हे फर्गसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. गोळेंचे दहावीपर्यंतचे शिक्षण इंदौरलाच झाले. त्यानंतर १९३८मध्ये अकरावी-बारावीसाठी त्यांनी पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९४०मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हील इंजिनिअरिंग) प्रवेश घेतला. १९४३मध्ये अर्थात वयाच्या एकवीसाव्या वर्षी ते अभियांत्रिकी उत्तीर्ण झाले आणि त्याच वर्षी त्या काळी घेतली जाणारी फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्यांची आय.आर.एस.ई. म्हणून रेल्वेत निवड झाली.

त्यांची पहिली नियुक्ती सिकंदराबाद येथे झाली. या परिसरात नद्यांवरील रेल्वे पूल वाहून जाण्याचे प्रकार नेहमी घडत असत. पूल वाहून गेल्यानंतर रेल्वे सेवा एक एक महिना विस्कळीत व्हायची व जनजीवन ठप्प व्हायचे. एका पावसाळ्यात वेरूर नदीवरील महत्त्वाचा रेल्वे पूल वाहून गेला आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाली. किमान एक महिना तरी व्यवहार बंद राहणार होते. तेव्हा गोळेंनी नदीवर हंगामी गाईडर्स टाकले आणि अवघ्या दहा दिवसात रेल्वेसेवा सुरळीत चालू केली. त्यानंतर मुख्य पुलाच्या उभारणीला सुरुवात झाली. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण कामगिरी रेल्वेच्या २३३ शिल्पकार चरित्रकोश