पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११111 INIK DIA ग। 1946 गोडबोले, माधव दत्तात्रेय प्रशासन खंड खासगी सावकारीच्या जोखडातून जिल्ह्यातील आदिवासींची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने आदिवासींना तगाई तसेच खावटी कर्जांचे वाटप करण्याचा उपक्रमही गोडबोले यांनी नेटाने राबविला. रस्ते, शाळा, प्राथमिक आरोग्याच्या सुविधा जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यात जोमाने प्रवर्तित करण्याबाबतही गोखले यांनी पुढाकार घेतला. नाशिक येथील दोन वर्षांच्या कार्यकालानंतर गोडबोले यांची केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयात नियुक्ती झाली. दिल्लीत जाऊन मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच मॅसेच्यूसेट्स् येथील विल्यम्स महाविद्यालयात ‘विकासाचे अर्थशास्त्र’ हा ज्ञानशाखेतील एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती बहाल करून सरकारने गोडबोले यांची पाठवणी केली. अभ्यासक्रम पूर्ण करून भारतामध्ये परतलेल्या गोडबोले यांची नियुक्ती तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिगत सचिव म्हणून झाली. १९६८ ते १९७० या काळात गृहमंत्री म्हणून तर, १९७० ते १९७२ दरम्यान अर्थमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिगत सचिव या नात्याने गोडबोले नवी दिल्ली येथेच कार्यरत होते. पुढे केंद्रीय अर्थमंत्रालयातील अठरा महिन्यांची नियुक्ती १९७२-७३ मध्ये पूर्ण करून परतलेल्या गोडबोले यांची महाराष्ट्र सरकारने राज्याच्या उद्योग मंत्रालयात संयुक्त सचिव या पदावर १९७३ सालच्या जून महिन्यात नियुक्ती केली. राज्यात उद्योगांचे स्थानांकन करण्याबाबतच्या सर्वंकष धोरणाची निर्मिती, त्या वेळी, गोडबोले यांच्या धुरिणत्वाखाली केली गेली. १९७४ सालच्या डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध झालेले ते धोरण व्यापक स्तरावर नावाजले गेले. उद्योगांच्या स्थापनेबाबत एक सुसूत्रमय धोरण राज्याच्या पातळीवर आखले जाण्याचा आद्य प्रयोग महाराष्ट्रात साकारला. १९७५ सालातील एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्याचे उद्योग आयुक्त म्हणून गोडबोले यांनी सूत्रे स्वीकारली. परंतु, त्यानंतर केवळ चारच महिन्यांनी, म्हणजे १९७५ सालच्या ऑगस्ट महिन्यात, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सचिव म्हणून महाराष्ट्र सरकारने गोडबोले यांची नेमणूक केली. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण या दोन भिन्न वृत्ती-प्रवृत्तीच्या महनीय व्यक्तींचे सचिव म्हणून गोडबोले यांची केली गेलेली नियुक्ती गोडबोले यांच्या व्यक्तिमत्त्वातील सडेतोड, नि:स्पृह, कर्तव्यदक्ष आणि नेमून दिलेल्या कामाशी प्रांजल बांधिलकी जपणार्‍या प्रशासकावर प्रखर झोत टाकणारी आहे. डॉक्टरेटच्या प्रबंधाचे काम पूर्ण करण्यासाठी १९७६ सालच्या एप्रिल महिन्यात गोडबोले रजेवर गेले. डॉक्टरेटच्या प्रबंधाचे काम संपवून आलेल्या गोडबोले यांची महाराष्ट्र सरकारने १९७६ सालच्या जुलै महिन्यात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. राज्याच्या ऊर्जा खात्याचे सचिव पदही त्यांच्याकडेच सुपूर्त करण्यात आले. राज्य विद्युत मंडळाचे अध्यक्ष या नात्याने गोडबोले यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच स्पृहणीय ठरली. राज्यात त्या वेळी विजेचा तुटवडा होता. १९७४ २३० शिल्पकार चरित्रकोश