पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग। गोगटे, माधव गणेश प्रशासन खंड प्रसंग टाळता आल्याचेहीअधिकारी सांगतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत नाना पाटील, आचार्य अत्रे अशा प्रमुख नेत्यांनी कोल्हापूर येथील जिल्हाधिकार्‍यांच्या कचेरीवर धडक मोर्चा काढण्याचे ठरविले होते. गोखले त्या वेळी कोल्हापूर येथे डी.एस.पी. होते. धक्काबुक्की, चेंगराचेंगरी अशा गोष्टी न होता मोर्चा अडविण्याची योजना त्यांनी तपशीलवार आखलेली होती; परंतु वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे ती योजना त्यांना काही काळ बाजूला ठेवावी लागली. परंतु योग्य वेळ येताच मूळ योजना वरिष्ठांच्याच परवानगीने कार्यान्वित करून ती यशस्वीपणे पार पाडली. एखादी योजना नियोजनपूर्वक कशी पार पाडावी, याचे सुयोग्य उदाहरणच त्यांनी घालून दिले. हाताखालचे अधिकारी, तसेच अकॅडमीमध्ये येणारे ट्रेनी ऑफिसर्स यांना ते अतिशय सन्मानाने व प्रेमाने वागवीत. शिस्तीचे काटकोर पालन करावयास लावीत. सर्वांना समान न्याय हे त्यांचे तत्त्व होते. हाताखालील अधिकार्‍यास योग्य प्रकारे आपल्या कामाची माहिती करून देणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, त्यांना निर्णयक्षम बनविणे, विचारपूर्वक योग्य निष्कर्ष घेण्यास प्रवृत्त करणे, कोणतेही काम समजून व सखोल झाले पाहिजे यावर भर देणे, प्रसंगी टिपणी तयार करणे या व अशा अनेक प्रकारांनी हाताखालील अधिकार्‍यास आत्मनिर्भर बनविणे, अशा प्रकारे कार्य त्यांनी अविरतपणे केले. नगरहवेली मुक्तिसंग्राम प्रसंगातही त्यांनी प्रसंगावधान राखून अवघड जबाबदारी पार पाडली होती. तसेच, १९५६ मध्ये जेव्हा मुंबई भाषिक राज्याची घोषणा झाली, तेव्हा सुरत येथे तणावपूर्ण भीती निर्माण झाली होती. तेथील काँग्रेस भवनावर द्विभाषिक विधेयक आंदोलकांचा रोष ओढवेल अशी परिस्थिती होती. या वेळी विलक्षण व्यूहरचना करून, पोलीस बळाचा कमीतकमी वापर करून गोखले यांनी योग्य कामगिरी केली. त्या योगे संभाव्य हिंसाचार टळून शांतता टिकून राहिली. संपूर्ण पोलीस दल हे एक कुटुंब आहे व दलातील सर्वांनी एकोप्याने राहिले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्यानुसार ते सर्वांना सर्वतोपरी मदत करीत असत. नि:स्पृह, कर्तव्यनिष्ठ, तत्पर, स्वच्छ, धैर्यशील, दक्ष, उत्साही, स्पष्टवक्ते अशा प्रकारची त्यांची प्रतिमा जनमानसात झाली. सेवानिवृत्तीनंतर दोन वेळा त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून काम केले. तसेच अनेक सामाजिक संस्थांवर त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले, उदा. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणारी संस्था, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, औरंगाबाद शाखा, श्री संस्थान एकनाथ महाराज, पैठण येथे विश्वस्त. गोखले यांच्या सहधर्मचारिणी इंदुमती यांनीही त्यांना सर्व गोष्टींत पाठिंबा दिला व कुटुंबाची संपूर्ण जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली होती. - वसुधा विशाल कानडे

गोगटे, माधव गणेश मुख्य वनसंरक्षक १५ नोव्हेंबर १९४३ माधव गणेश गोगटे यांचा जन्म मुंबई येथे झाला. मुंबर्ई येथील अ.भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. १९६४मध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांत बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण केले. तसेच तारापोरवाला मत्स्यालय मुंबईमधून त्यांनी एम.एस्सी. पूर्ण केले. वडील गणेश गोखले यांना ‘टॅक्सिडर्मी’ ही कला अवगत होती. त्यामुळेच माधव २२६ शिल्पकार चरित्रकोश