पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड गोखले, श्रीपाद गणेश त्यामुळे काही काळ कास्पचे अध्यक्षपद सोडले. ते संपादक असताना केसरीच्या जन्मशताब्दीचा मोठा समारंभ झाला. केसरीचे संपादक म्हणून त्यांना राजीव गांधीबरोबर युरोप, रशिया व चीनचा दौरा करता आला. केसरीचा निरोप घेतल्यावर प्रतापराव पवार यांच्या सूचनेवरुन सकाळ चॅरिटी ट्रस्टचे विश्वस्तपद डॉ. गोखले यांनी स्वीकारले. त्याच वर्षी पुणे विद्यापीठावर गव्हर्नरांचा प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक झाली. अलीकडे ते प्रामुख्याने कास्पचेच काम करीत असतात व त्यामुळे देश-विदेशात त्यांना भ्रमंती करावी लागते. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासचिवांनी त्यांची बर्‍याच समित्या, शिक्षण संस्था व प्रतिष्ठानांवर संचालक म्हणून नेमणूक केली आहे. या सर्व प्रवासात डॉ. गोखले यांच्या हातून इतरही अनेक कामे घडली. इंग्रजी मराठी मिळून त्यांची तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १९९८ सालचा कुष्ठकार्याविषयीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार त्यांच्या वाट्याला आला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेला संबोधित करण्याचा बहुमान जे.आर.डी.टाटा यांच्यानंतर डॉ.गोखले यांच्याकडेच आलेला आहे. वयोवर्धन क्षेत्रातील कामाबद्दल १९९६ मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. - सविता भावे

गोखले, श्रीपाद गणेश महासंचालक - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग संचालक - लाचलुचपत विरोधी खाते १ ऑगस्ट १९१६ - २२ मार्च २००४

श्रीपाद गणेश गोखले यांचा जन्म मिरज येथे एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत प्रथमत: बी.ए.पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण करून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. पुण्याच्या भावे स्कूलमध्ये १९३८ ते १९४३पर्यंत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. त्याच वेळी इंग्रजीमधून एम.ए. पदवीसुद्धा घेतली. १९४३ ते १९४९मध्ये त्यांनी इंडियन आर्मी ऑर्डनन्स कोअरमध्ये ऑर्डनन्स ऑफिसर म्हणून काम केले. १९४८च्या मध्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे एका विशेष निवड समितीतर्फे पोलीस सेवेसाठी अर्ज मागवण्यात येत होते. याद्वारे गोखले १९४९ च्या जानेवारीत जोखीम सेवेत रुजू झाले. प्रशिक्षणानंतर सुरत जिल्ह्यात सहायक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी पालनपूर, सुरत, नाशिक, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी १९६२ पर्यंत काम केले. त्यानंतर नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण शाळा येथे त्यांची नेमणूक प्राचार्य पदावर  झाली. 

१९६४ पर्यंत प्राचार्य म्हणून काम केल्यावर १९६४ ते १९६६ मध्ये त्यांनी दिल्ली येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग उपमहानिरिक्षक पद भूषविले. १९६६ ते १९७० औरंगाबाद येथे उपमहानिरिक्षकपदी काम केले. १९७० ते जून १९७१ लाचलुचपतविरोधी खात्याच्या संचालकपदी काम केले. जुलै १९७१ ते जानेवारी १९७२ दरम्यान त्यांनी पुणे पोलीस आयुक्त पद भूषविले. १फेब्रुवारी१९७२ ते ३१जुलै१९७४, अर्थात सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीच्या संचालकपदाची धुरा सांभाळली. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही श्रीपाद गोखले यांनी विविध सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेऊन व्यतीत केले. लहान गोष्टीतही स्पष्ट मुद्देसूद विचार करावा असे मार्गदर्शन आपल्या अधिकार्‍यांना गोखले आपल्या कृतीतून देत असत. सुरुवातीच्या काळात गोखले यांच्या हाताखाली प्रशिक्षण मिळाल्याने जमाव नियंत्रित करताना लाठीहल्ला व गोळीबार करण्याचे शिल्पकार चरित्रकोश