पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ग । प्रशासन खंड गोखले, शरच्चंद्र दामोदर न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्या शाळेच्या टिळक बालवीर कुलात ते होते. त्यामुळे त्यांची सामाजिक जाणीव आपोआप बळकट होत गेली. तेथील स्काउट मास्तर वि.सी. भागवत हे एक असामान्य शिक्षक होते. घरात पत्रकारिता आणि राजकारण होतेच. १९४६ मध्ये फर्गसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांत त्यांनी बी.ए. पदवी मिळवली. पदवी मिळविल्यावर पुढे काय करावे याबद्दल दोन-तीन पर्याय होते. वकील होऊन राजकारणात पडावे, लंडनला जाऊन पत्रकारितेचे शिक्षण घ्यावे किंवा विकासाच्या कामात स्वत:ला झोकून द्यावे. १९४२ ते १९४६ हा राजकीयदृष्ट्या फार नाट्यपूर्ण काळ होता. सर्व राजकीय पक्षांची माणसे त्यांच्या घरी येत असत. फर्गसन महाविद्यालयात प्रा.कोगेकर, प्रा.मावळंकर यांचा विद्यार्थ्यांवर मोठा प्रभाव होता. गोखले राजनीती आणि अर्थशास्त्राचे विद्यार्थी असले तरी मराठी साहित्याची आवड असल्याने प्रा.रा.श्री.जोग, पारसनीस, मोरे यांचेही ते शिष्य झाले. घरी येणार्‍या मंडळींपैकी अच्युतराव पटवर्धन यांनी त्यांची जे.कुमारप्पा यांच्याशी गाठ घालून दिली. त्यांचे बंधू डॉ.जे.सी. कुमारप्पा हे त्या वेळी टाटा इन्स्टिट्यूटचे प्रमुख होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गोखले त्या इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. टाटा समाजविज्ञान संस्थेत अभ्यास करणे हा एक वेगळाच अनुभव होता. या संस्थेतून १९४९मध्ये त्यांनी एम.एस.डब्ल्यू.ची पदवी घेतली. पुण्याच्या मराठी वातावरणातून एकदम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वातावरणात नेणारा तो बदल होता. सर्व राज्यांतले, परदेशांतले विद्यार्थी व प्राध्यापक तिथे होते. मुंबईला डॉ.पी.व्ही.मंडलिक यांच्या घरी गोखले राहत असत. त्यांच्या घरी येऊन राहणार्‍या साने गुरुजी, अरुणा असफअली अशांचा प्रभाव गोखले यांच्यावर पडला. देशाची फाळणी झाली त्या वेळी पंडित नेहरू यांच्या सांगण्यावरून निर्वासितांचे काम करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटमार्फत वीस विद्यार्थी व विद्यार्थिंनींना दिल्ली व कुरुक्षेत्र येथे पाठविण्यात आले. त्या दरम्यान पंडित नेहरू, गांधीजी यांच्या भेटी होण्याचा योग आला. विद्यार्थी असतांनाच पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेने निर्वासितांच्या प्रश्‍नावर गोखले यांचे व्याख्यान ठेवले व बावीसाव्या वर्षी त्यांचा मोठा गौरव झाला. ‘मौजे’च्या भागवतांनी त्यांच्या साप्ताहिकासाठी निर्वासितांच्या प्रश्‍नावर लेखमाला लिहायला सांगितली त्यातून ‘निर्वासितांचा प्रश्‍न’ हे पुस्तक निर्माण झाले. त्याला काकासाहेब गाडगीळांनी प्रस्तावना लिहिली. शिक्षण चालू असतांनाच मुंबईच्या रघुनाथराव आपटे या उद्योगपतींच्या मुलीशी, मालतीशी गोखले यांचा विवाह झाला. टाटा इन्स्टिट्यूटमध्येच विद्यापीठ अनुदान मंडळाच्या वतीने अभ्यागत प्राध्यापक म्हणून गोखले यांना एक वर्षासाठी निमंत्रित करण्यात आले. त्यावेळी इन्स्टिट्यूटकरिता भारतातील सुधार प्रशासन आणि गुन्हेगारी या विषयावर एक ग्रंथ प्राध्यापकजे.जे.पानाकल यांच्याबरोबर गोखले यांनी संपादित केला. सामान्य विज्ञानात डॉक्टरेट मिळविण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. इन्स्टिट्यूटमध्ये ती सोय नसल्याने बनारसच्या काशी विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केली. ते शिकत असताना सरकारी समाजकल्याण खात्याचे उपसंचालक गोविंदराव हर्षे यांच्यामुळे ते त्या खात्यात दाखल झाले. पुण्याच्या रिमांड होमचा चीफ ऑफिसर म्हणून त्यांची नेमणूक झाली. हर्षे व के.डेव्हिस या इंग्रज बाईंनी महाराष्ट्रात रिमांड होमची चळवळ शिल्पकार चरित्रकोश