पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग। गोखले, शरच्चंद्र दामोदर प्रशासन खंड भुवनेश्वरची जडणघडण यांचा समावेश होता. या योजनांमुळे गोखले ओरिसात लोकप्रिय झाले होते. भारत स्वतंत्र होण्याआधी काहीच महिने गोखले यांची दिल्लीत बदली झाली. नंतर स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील काकासाहेब गाडगीळ यांच्या सार्वजनिक बांधकाम, खाण आणि ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदाची जबाबदारी गोखल्यांवर सोपवण्यात आली. या विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या सिंचन आणि वीजनिर्मिती क्षेत्रातल्या अनेक बहुउद्देशीय प्रकल्पांचा पाया गोखले याच्या कारकिर्दीत रचला गेला. याशिवाय दिल्लीत आज जगभरच्या राजदूतांची कार्यालये असलेल्या चाणक्यपुरी विभागाची आखणी करण्यात गोखले यांचा मोठा सहभाग होता. १९५२मध्ये निवृत्तीनंतर जवाहरलाल नेहरू यांनी गोखले यांची नेपाळमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. नेपाळला भूपृष्ठ वाहतुकीने भारताशी जोडणारा काठमांडूपासूनचा त्रिभुवन राजमार्ग तयार करण्यात गोखले यांचे महत्त्वाचे योगदान होते. गोखले यांचे देशातल्या नदी-खोरे विकास या विषयावर चांगले प्रभुत्व होते. म्हणूनच भारतात परतल्यावर १९५५मध्ये गोखले यांची तुंगभद्रा आंतरराज्य पाणी वाटप मंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली. या प्रकल्पाअंतर्गत सिंचन आणि वीजनिर्मितीचा प्रस्ताव होता. भारत सरकारने १९५८-५९मध्ये गोखले यांच्या नेतृत्वाखाली आंतरराज्य जलवाहतूक समिती स्थापन केली. या समितीच्या अहवालातल्या शिफारशी आजही महत्त्वाच्या मानल्या जातात. प्रकृतीच्या कारणास्तव गोखले यांनी १९६७मध्ये तुंगभद्रा आंतरराज्य पाणीवाटप मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि ते सक्रिय सेवेतून निवृत्त झाले. गोखले यांनी पुण्यातल्या कर्वे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि डेक्कन जिमखाना व्यवस्थापकीय समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. तसेच नदी खोरे विकास, शिक्षण, यांसारख्या विषयांवर भरपूर लेखनही केले. गोखले यांचे प्रदीर्घ आजाराशी झगडत असताना निधन झाले. यांचे पुत्र अशोक गोखले यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. - संपादित

गोखले, शरच्चंद्र दामोदर भारतीय समाजकल्याण संस्था, आंतरराष्ट्रीय समाज विकास महामंडळ, आशिया व पॅसिफिक विभाग प्रमुख २१ सप्टेंबर १९२५ शरच्चंद्र दामोदर गोखले यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव वत्सला. त्यांचे वडील दामोदर वि. गोखले, हे नामवंत समाजसेवक आणि पत्रकार, केसरीचे संपादक होते. गोखले यांना बालपणीच मातृसुखाला पारखे व्हावे लागले. मात्र वडील बाबूराव, क्रांतिकारक काका नानासाहेब आणि आत्या यांनी त्यांच्यावर भरभरून संस्कार केले. त्यांचे घर ही एक सामाजिक संस्थाच होती. वडिलांच्या बरोबर त्यांना भरपूर वाचायला मिळाले. घराजवळच्या २२२ शिल्पकार चरित्रकोश