पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग । प्रशासन खंड गोखले, भालचंद्र कृष्णाजी ते महाराष्ट्र आणि गोव्यामधील धरणातील गळती नियंत्रणासाठी सल्ला देणे तसेच पाणी व्यवस्थापन या विषयाचे सल्लागार म्हणून काम पाहतात. - संध्या लिमये

गोखले, भालचंद्र कृष्णाजी आय.सी.एस.,पहिल्याराष्ट्रपतींचेप्रथमसचिव २३ जुलै १८९२ - १० ऑक्टोबर १९७३ भालचंद्र कृष्णाजी गोखले यांचे शालेय शिक्षण पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयात तर पदवीपर्यंतचे शिक्षण फर्गसन महाविद्यालयात आणि इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात झाले. केंब्रिजमध्ये असतानाच १९१४ साली यांनी तत्कालीन ब्रिटिश राजवटीतील भारतीय नागरी सेवा (आय.सी.एस.) परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे वडील कृष्णाजी केशव गोखले ब्रिटिश राजवटीतल्या जत संस्थानात न्यायाधीश आणि प्रशासक (कारभारी) म्हणून नोकरीला होते. भालचंद्र गोखले यांनी इंग्लंडहून १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर ओरिसातल्या खुर्दा येथे जिल्हाधिकारी आणि सहायक न्यायाधीश या पदाचा कार्यभार यांनी स्वीकारला. यानंतर यांची नियुक्ती बिहारातील पुरूलियाचे जिल्हाधिकारी म्हणून झाली. काही काळातच यांनी छोटा नागपूरचे विशेष पुनर्वसन अधिकारी म्हणून सूत्र हाती घेतली. या पदावर असताना १९१८-१९२५ या सहा-सात वर्षात यांनी मानभूम जिल्ह्यासाठी महसूल आणि पुनर्वसनाचा खास अहवाल सादर केला. या प्रदेशासाठी हा अहवाल इतका उपयोगी ठरला की १९२८मध्ये ब्रिटिश प्रशासनाने गोखले यांचा खास गौरव केला. यानंतर बिहार शासनाने गोखले यांची प्रदेशाचे शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती केली. ते काही काळ गयाचे जिल्ह्यात जिल्हाधिकारी होते. १९३७मध्ये मुंगेर या जिल्ह्यात त्यांची नियुक्ती झाली. मुंगेरला असताना आपल्या देशप्रेमामुळे त्यांनी ब्रिटिश शासनाचा रोषही ओढवून घेतला होता. नंतर त्यांनी काही काळ प्रदेशाचे अर्थसचिव म्हणून काम पाहिले. १९४२मध्ये गोखले यांची भागलपूर येथे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. यावेळी संपूर्ण देशभर ‘छोडो भारत’ चळवळ उसळली होती. तेव्हा गोखले यांनी संयम बाळगून पण खंबीरपणे परिस्थिती हाताळली. नंतर बिहारमध्ये पटना येथे आयुक्त या पदावर १९४४मध्ये गोखले यांची नियुक्ती झाली. हा काळ स्वातंत्र्यलढ्याचा असल्याने डॉ.राजेंद्रप्रसाद, जयप्रकाश नारायण आणि बाबू जगजीवनराम अशा अनेक राष्ट्रीय नेत्यांशी गोखले यांचा प्रशासक म्हणून संबंध आला. नंतर १९५०मध्ये डॉ.राजेंद्रप्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांनी आपले सचिव म्हणून आग्रहाने गोखले यांचीच निवड केली होती. १९४३मध्ये ब्रिटिश शासनाने सी.आय.ई. (कँपॅनियन ऑफ इंडियन एम्पायर) हा किताब देऊन गोखले यांचा गौरव केला. पुढच्या दोन वर्षांत यांना सी.एस.आय. (कँपॅनियन ऑफ दी स्टार ऑफ इंडिया) हा आणखी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. याच सुमारास देशातल्या बहुतेक राज्यातल्या काँग्रेस सरकारांनी राजीनामे दिले होते. या कारणास्तव राज्यांचे प्रशासकीय प्रमुख म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गव्हर्नर नेमले होते. परिणामी ओरिसाचे गव्हर्नर या पदावर सर हॉथोर्न लुईस यांची नेमणूक झाली होती. त्यांचे प्रशासकीय मदतनीस दोन अधिकारी सल्लागार नेमण्यात आले आणि गोखले हे त्यापैकी एक होते. या काळात गोखले यांनी ओरिसाच्या विकासासाठी योजना आलेख तयार केला होता. या योजनेत हिराकूड धरण, पारादीप बंदर विकास आणि ओरिसाची नवी राजधानी म्हणून शिल्पकार चरित्रकोश